Musician Dies in Plane Crash Saam Tv
मनोरंजन बातम्या

Musician Death: जगप्रसिद्ध गीतकाराचे विमान अपघातात निधन; संगीत विश्वात शोककळा

Musician Dies in Plane Crash: ग्रॅमी विजेते गीतकार ब्रेट जेम्स यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Musician Dies in Plane Crash: जुबिन गर्ग यांच्या निधनानंतर संगीत विश्वाने आणखी एक तेजस्वी तारा गमावला आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि नॅशव्हिल सॉन्गरायटर्स हॉल ऑफ फेममधील गीतकार ब्रेट जेम्स यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी विमान अपघातात निधन झाले. असंख्य हिट गाणी लिहून संगीत प्रेमींच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण करणारे जेम्स आता या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे निधन पावले आहेत.

अपघाताची संपूर्ण कहाणी

१८ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंब आणि चाहत्यांना शोककळा पसरली आहे. वृत्तानुसार, ब्रेट जेम्स प्रायव्हेट विमानात प्रवास करत होते ते उत्तर कॅरोलिनातील फ्रँकलिन येथे कोसळले. विमान एका शाळेजवळ कोसळले आणि त्याला आग लागली. अपघाताच्या वेळी तीन लोक विमानात होते आणि दुर्दैवाने, कोणीही वाचले नाही. मॅकॉन काउंटी शेरीफच्या कार्यालयाने पुष्टी केली की जवळच्या आयोटला व्हॅली प्राथमिक शाळेतील सर्व मुले आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. पण विमान प्रवसींचे निधन झाले.

संगीत क्षेत्रात शोककळा पसरली

जेम्सच्या निधनाची बातमी पसरताच संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली. गायक जस्टिन अॅडम्स यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "आपण एक दिग्गज गमावला आहे. ब्रेट केवळ उत्तम गीतकार नाहीच तर एक अतिशय दयाळू व्यक्ती देखील होता. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने नेहमीच मला प्रोत्साहन दिले. त्याचे पाठबळ कधीही विसरता येणार नाही."

एका म्यूझिक पेजवरुन त्यांना श्रद्धांजली देण्यात आली, आज, संगीत क्षेत्राने आपला एक स्टार गमावला आहे. ब्रेट जेम्सची गाणी नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहतील. त्यांनी तयार केलेले सुर आणि बोल येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील." ब्रेट जेम्सची यांनी त्यांच्या कारकिर्दीत ५०० हून अधिक गाणी रेकॉर्ड झाली, त्यापैकी २७ गाणी चार्टबस्टर ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manchurian Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ग्रेव्ही मंच्युरियन, वाचा रेसिपी

Kantara Chapter 1: 'कांतारा: चॅप्टर 1'मध्ये हृतिकची खास भूमिका; या दिवशी येतोय चित्रपटाचा ट्रेलर

Maharashtra Live News Update: - ओला दुष्काळ जाहीर करा, उबाठाने केली मागणी..

GK : कोणत्या देशात पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे? जाणून घ्या

Vijaydurg Fort History: गुप्त बोगदे, भक्कम तटबंदी..., जाणून घ्या विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT