Sonakshi Sinha And Zaheer Iqbaal News Instagram
मनोरंजन बातम्या

Sonakshi- Zaheer Wedding Update : सोनाक्षी सिन्हानं लग्नाआधीच असं काय केलं की सासू-सासऱ्यांच्याही डोळ्यांवर विश्वास बसेना!

Sonakshi Sinha And Zaheer Iqbaal News : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या घरी लगीनघाई सुरू आहे. सोनाक्षीने सासरच्या मंडळींसोबत 'फादर्स डे' सेलिब्रेट केला आहे. सध्या तिचा सासू-सासऱ्यांसोबतचा फोटो व्हायरल होतोय.

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या घरी लगीनघाई सुरू आहे. येत्या २३ जूनला बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न करणार आहे. 'फादर्स डे' निमित्त सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर सासरच्या मंडळींसोबत काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने त्यांच्यासोबत एकत्र टाईमही स्पेंड केला आहे.

सध्या सोनाक्षी तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. २३ जूनला बॉयफ्रेंड झहीर इकबालसोबत लग्न करणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच वेडिंग कार्ड व्हायरल झालं होतं. हेमा कुरेशी,पुनम ढिल्लों, आयुश शर्मा, हनी सिंह यांनी वेडिंग कार्ड मिळाल्यानंतर सोनाक्षी आणि इक्बाल यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सोनाक्षीने इन्स्टा स्टोरीमध्ये सासरच्या फॅमिलीसोबत फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत 'फादर्स डे'च्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbaal Post

तर दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी जहीर इकबालच्या फॅमिलीसोबत दिसते. जहीर, त्याचे आई- वडील आणि त्याचा भाऊ या फोटोमध्ये दिसत आहे. सध्या सोनाक्षी सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली असून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. झहीर इकबालचा बिझनेसमन फॅमिलीमध्ये जन्म झालेला आहे. त्याचे वडील इकबाल रतनसी हे सुप्रसिद्ध ज्वेलर्स आणि व्यापारी आहेत. झहीरच्या सिनेकरियरबद्दल बोलायचे तर, त्याने २०१९ मध्ये 'नोटबुक' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले आहे.

सोनाक्षीने आणि झहीरने 'डबल एक्सल' चित्रपटात काम केले आहे. दोघांची पहिली भेट सलमान खानच्या एका पार्टीत झाली होती. तेव्हापासून त्यांची मैत्री झाली. नंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या कपलने त्यांचं रिलेशन जरीही प्रायव्हेट ठेवलं असलं तरीही अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti: नाशिकचा तिढा सुटला, पण पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं अडलं, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?

घायल हूं इसलिए घातक हूं! 'धुरंधर' विराट कोहलीनं ठोकलं तुफानी शतक, विजय हजारे ट्रॉफीत दणका उडवला

Weight Loss Diet plan: न्यू एयरपासून वजन कमी करण्यासाठी डाईट करणार? मग 'हा' घ्या तुमचा डेली प्लॉन

Maharashtra Live News Update: नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी अंकली ते चोकाक भूसंपादनाचा मार्ग मोकळा

Jio Recharge: jio युजर्ससाठी खुशखबर! 84 दिवसांचा हा प्लान फक्त ६०० रुपयात, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT