Ankita Walawalkar Kase Visru Song Released Instagram
मनोरंजन बातम्या

Kase Visru Song Released: अंकिता वालावलकरचं नवं गाणं रिलीज, ‘कसे विसरु’ मध्ये कोकण हार्टेडसोबत दिसणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता

Kase Visru Song Out: सोशल मीडिया इन्फ्लूएंसर म्हणून चर्चेत राहणारी अंकिता वालावलकर आपल्या आगामी गाण्यांमुळे चर्चेत आली आहे. "कसे विसरु" असं तिच्या नव्या गाण्याचे नाव असून नुकतंच ते युट्यूबवर रिलीज झालं आहे.

Chetan Bodke

Ankita Walawalkar Kase Visru Song Released

‘कोकण हार्टेड गर्ल’ नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकरची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होते. नेहमीच सोशल मीडियावर अंकिता वालावलकरच्या फोटोंची असो किंवा व्हिडीओची असो चर्चा होत असते. सोशल मीडिया इन्फ्लूएंसर म्हणून चर्चेत राहणारी अंकिता वालावलकर आपल्या आगामी गाण्यांमुळे चर्चेत आली आहे. "कसे विसरु" असं तिच्या नव्या गाण्याचे नाव असून नुकतंच ते युट्यूबवर रिलीज झालं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

“दादर अभिमान गीता”च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स निर्मित हा तिसरा व्हिडिओ आहे. सध्या ह्या गाण्याला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद आहे. गाण्याची पटकथा, दिग्दर्शन, मांडणी ही प्रणिल हातिसकरने केली आहे.

तसेच प्रख्यात गायक केवल वाळंज ह्यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं स्वरबद्ध केले आहे. या गाण्यातून आपल्या सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि मराठी टेलिव्हिजन अभिनेता विवेक सांगळे अशी नवीन जोडी आपल्या भेटीला आली आहे. (Song)

“एखादी गोष्ट सरळ दाखवणं हे तुलनेने बऱ्यापैकी सोप्पी आहे. कारण जेव्हा गोष्ट उलटी उलगडत आपण नेतो त्यावेळेस कलाकारांचे हावभाव सुद्धा बदलतात. ही गोष्ट फार बारकाईने करावी लागते आणि तेच बारकावे अत्यंत सुरेख पद्धतीने आम्ही गाण्याची निर्मिती केली आहे.” असं गाण्याबद्दल गाण्याचे दिग्दर्शक प्रणिल हातिसकर यांनी सांगितले. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT