सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरची एक रील सध्या चर्चेत आहे. या रीलमुळे कोकण हार्टेड गर्लवर टीकेचा भडिमार होत आहे. टीकेनंतर कोकण हार्टेड गर्लने कमेंट करून स्पष्टीकरण दिल्याचंही तिच्या पोस्टमध्ये दिसून येत आहे.'ये पब्लिक है ये सब जानती है...', याचा अनुभव अंकिताला आला आहे.
झालं असं की, अंकिता वालावलकरने एक शॉप सुरु केलं आहे. हे शॉप सांभाळण्यासाठी अंकिताला एका मेहनती मुलीची गरज असल्याचं तिने तिच्या मित्राला सांगितलं होतं. तिच्या मित्रानेही एका मुलीला नोकरीसाठी तिच्याकडे पाठवलं होतं. ( साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र त्या मुलीने नोकरीसाठी नकार दिला. मात्र मुलीने नोकरीसाठी दिलेला नकार आणि कारण हे अंकिताला पटलं नाही. दुकानात झाडू मारावा लागेल हे ऐकून मुलीने नोकरीसाठी नकार दिला. त्यानंतर अंकिताने व्हिडीओ तयार करून तो किस्सा सांगितला. मुलीच्या एकूणच 'अॅटिट्युड'वर तिने प्रश्न उपस्थित केले. (Latest Marathi News)
मात्र हा रील करणे अंकिताला चांगलंच महागात पडलं. अंकिताने सांगितलेला किस्सा नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यानंतर अनेकांची तिच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त करण्यास सुरू केली. एका टीकेला उत्तर देताना अंकिताने असंही म्हटलं की, १० हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्ट हा प्रकार बोलू नये. मात्र अंकिताची ही कमेंट वाचून तर अनेकांची सटकली. मात्र ट्रोल होतोय असं लक्षात येताच अंकिताने स्पष्टीकरण दिलं.
'वास्तव' असं कॅप्शन देत तयार केलेल्या व्हिडीओच्या कमेंटमध्ये अंकिताने म्हटलं की, काही मुलींच्या अपेक्षा पाहून तयार केलेला व्हिडीओ आहे. एवढंच सांगायचंय की गरज असताना अपेक्षांच्या नावाखाली घरी बसू नका. शॉपमध्ये झाडू मारल्याने आत्मसन्मान कमी होत नाही. कोणत्याही मुलीवर बनवलेली ही रील नाही. अशी कोणतीही मुलगी अस्तित्वात नाही.
एका यूजरने म्हटलं की, १० हजार पगार घेणाऱ्या मुलीने सेल्फ रिस्पेक्टवर का बोलू नये? तिला सेल्फ रिस्पेक्ट का असू नये. तिला नाही पटलं ती नाही बोलली. तुम्हाला नाही पटलं तुम्ही नका घेऊ. पण कुणाला किती आत्मसन्मान असावा हे तुम्ही ठरवू शकत नाही.
दुसऱ्या एका यूजरने म्हटलं की, असे बोलून तुम्ही निश्चितच अनेक लोकांचा तुमच्याबद्दलचा आदर गमावला आहे.
एका यूजने लिहिलं की, झाडू मारायचा होता तर तू तरी पॅशन का विचारलं? आणि तिच्या पॅशनला टिपिकल का म्हणालीस? उगाच एखाद्याची इज्जत काढण्यासाठी प्लॅटफॉर्मचा वापर करू नका.
kokan_kanya_snehakolte नावाच्या एका यूजरने लिहिलं की, आपण किती कमावतो यावर आपला सेल्फ रिस्पेक्ट ठरतो का? लोक ऐकतात म्हणून काहीही नसतं बोलायचं ताई. तू तुझ्या ऑफिसमध्ये झाडू मारला होतास का?
being.jitendra नावाच्या यूजरने लिहिलं की, तू जर कोणाच्या इंटरव्ह्यूचे असे व्हिडीओ बनवशील तर इतर लोक तुझ्याकडे नोकरीला येण्याआधी विचार करतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.