Kajol Devgan Net Worth Instagram/ @kajol
मनोरंजन बातम्या

Kajol Devgan Birthday : अभिनयासोबतच बिझनेसमध्येही काजोल देवगण सुपरहिट, एकही चित्रपट हाती नसताना कमावते कोट्यवधी

Kajol Devgan Net Worth : बॉलिवूडची 'बाजीगर गर्ल' अर्थात काजोल देवगण हिचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस आहे. काजोल आज आपला ५० वा वाढदिवस सेलिब्रेट करते.

Chetan Bodke

बॉलिवूडची 'बाजीगर गर्ल' अर्थात काजोल देवगण हिचा आज (५ ऑगस्ट) वाढदिवस आहे. काजोल आज आपला ५० वा वाढदिवस सेलिब्रेट करते. काजोल गेल्या तीन दशकांपासून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. तिला बालपणापासूनच आपल्या घरातून अभिनयाचे बाळकडू मिळाले आहेत. त्यासोबतच तिचा पतीही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. बॉलिवूडचा ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगणची ती पत्नी आहे. जाणून घेऊया अभिनेत्रीबद्दल...

अभिनेत्री काजोल देवगण ९०च्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आज काजोल हिच्यावर वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटी मित्रांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. काजोल चित्रपटांव्यतिरिक्त साईड बिझनेसमधूनही भरपूर कमाई करते. चित्रपटांव्यतिरिक्त काजोल मॉडेलिंग, ब्रँड अँडोर्समेंट आणि तिच्या बिझनेसमधून कमाई करत आहे. अभिनेत्री समाजसेवेच्या कामातही खूप सक्रिय आहे. सोबतच तिचा स्वत:च्या मालकीचा मेकअप ब्रँडही आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोल मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि बिझनेसमधून दरवर्षी २५ कोटींहून अधिक कमावते. काजोल देवगणची एकूण संपत्ती २५० कोटी इतकी आहे. चित्रपटांमध्ये ती सातत्याने दिसत नसली तरी सोशल मीडियावर तिचा फार मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय, काजोलला भारतातील चौथा सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. काजोल गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. काजोल शेवटची कोर्टरूम ड्रामा सीरिज ‘द ट्रायल’ आणि ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये दिसली होती.

काजोलची आई तनुजा आणि आजी शोभना समर्थ याही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल आणि तिची धाकटी बहीण तनिषाही इंडस्ट्रीत होती, पण नंतर तिची बहिण इंडस्ट्रीत दिसली नाही. काजोल आणि अजयने १९९९ मध्ये लग्न केले. काजोलने १९९२ मध्ये रिलीज झालेल्या 'बेखुदी' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. काजोलला १९९३ मध्ये झालेल्या 'बाजीगर' चित्रपटाने विशेष प्रसिद्धी मिळाली. काजोलने आपल्या फिल्मी करियरमध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत अनेक हिट चित्रपटांतही काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT