शेवग्याची भाजी ही अनेकांच्या आवडीची भाजी असते. घरात ज्वारीच्या भाकरीसोबत लोक खातात.
उन्हाळ्यामध्ये गावकरी लोक शेवग्याची भाजी मोठ्या प्रमाणात खातात. तिचा सुंगध आणि चव काही वेगळीच आणि भन्नाट असते.
प्रत्येक भागात शेवग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. त्यामध्ये मसूर डाळीत, सूपमध्ये, स्मूदी किंवा इतर भाज्यांमध्ये तिचा वापर करतात.
ज्या लोकांनी डायबेटीजचा त्रास आहे. त्यांनी ही भाजी नेहमीच खाल्ली पाहिजे. त्याने शरीरातल्या साखरेची पातळी नियंत्रणात येते.
तुम्हाला जर अनेक वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या पानांची भाजी असली पाहिजे.
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही शेवग्याच्या पानांची भाजी खाणं गरजेचं आहे. त्याने कोलेस्ट्रोलसुद्धा कमी होतं.
तुम्हाला जर जीवघेण्या कॅन्सरच्या आजाराची लागण झाली असेल तर तुम्ही आहारात शेवग्याच्या पानांची भाजी खात राहा. त्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.