Shreya-Kushal Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Shreya Bugde- Kushal Badrike Diwali Wishes : 'चला हवा येऊ द्या' स्टार श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिकेने एका हटके अंदाजात चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके सध्या 'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांनी एक खास व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके कायम मजेशीर व्हिडीओ बनवत असतात.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या शोने संपूर्ण जगाला खूप हसवले आहे. या शोमुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली आहे. या शोमधून कुशल बद्रिके ( Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugde) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही दोघे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या मजेशीर व्हिडीओने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सध्या असाच एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेने भयानक रुपामध्ये चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेया बुगडे मंजुलिकाचा अवतार धारण केला आहे. विस्कटलेले केस, केसात गजरा माळला आहे. कपाळावर कुंकवाचा टिळा लावला आहे. केशरी रंगाची साडी नेसली आहे. ज्यामुळे ती मंजुलिका सारखी दिसत आहे. तर कुशल बद्रिकेने 'बाहुबली' चित्रपटातील 'कालकेय'च्या भयानक अवतारात दिसत आहे.

चाहत्यांच्या कमेंट्स

कुशल आणि श्रेयाच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. एक युजरने लिहिलं की, "हसवायचे सोडून सणासुदीला का घाबरवता तुम्ही", तर इतर नेटकरी याला बोलतात, "खऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा", "खूपच भयानक शुभेच्छा आहेत", "भीत भीत तुम्हाला पण शुभेच्छा", "अरे वा मंजुलिकाला बऱ्याच भाषा बोलता येतात बंगाली, मराठी आणि ..." अशा कमेंट्स करत आहेत.

दिवाळीच्या शुभेच्छा

"आता ह्या श्रेया बुगडेला बघा भुताच्या getup मधे सुद्धा दिवाळीच्या 'कंदीला'सारखी दिसते अगदी तेजस्वी आणि मी पहा स्फोट झालेल्या सुतली बॉम्बसारखा दिसतोय. पण दिवाळीची खरी मज्जा ह्या दोन्ही गोष्टीं शिवाय नाहीच. आज आम्ही तसेच दिसतोय म्हणून आम्हा दोघांकडून ह्या अश्या शुभेच्छा...आनंदी रहा हसत रहा आणि तुमच्या वेडेपणात सामील होतील असेच मित्र जवळ बाळगा..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: इंडिगोच्या विमानसेवेच्या गोंधळाचा फटका नागपुरात पोहचणाऱ्या मंत्री-आमदारांना

नाशिकमध्ये भाविकांवर काळाचा घाला, कार ३०० फूट दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT