Sonakshi Sinha Marriage Date : "सोनाक्षी- झहीरचं लग्न २३ जूनला होणार नाही...", शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाविषयी दिली माहिती
Sonakshi And Zaheer Wedding Date On Shatrughna Sinha Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonakshi Sinha Marriage Date : "सोनाक्षी- झहीरचं लग्न २३ जूनला होणार नाही...", शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाविषयी दिली माहिती

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल येत्या २३ जूनला लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. नुकतीच त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. सोनाक्षीचे वडील आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी लेकीच्या लग्नाच्या तारखेबद्दल सांगितले आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी, या दोघांचंही लग्न २३ जूनला होणार नाही, असा खुलासा त्यांनी केलेला आहे.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, "जेव्हा मी तुमच्यासोबत बोलत आहे, तेव्हापासून बरंच काही बदललं आहे. मी तुम्हाला सर्वच माहिती सांगू शकत नाही, कारण ही आमची कौटुंबिक गोष्ट आहे. मी पहलाज निहलानी यांना तुमच्याशी बोलण्यास सांगितलं होतं. पण त्यांच्या ऐवजी मीच तुमच्यासोबत बोलणं उत्तम असेल, असा विचार केला. होय, मी आणि माझी पत्नी २३ जूनला होणाऱ्या सेलिब्रेशनचा भाग आम्ही होणार आहोत. २३ जूनला लग्न होणार नसून लग्नाचं रिसेप्शन आहे. ज्यात आम्ही सर्वजण २३ जूनला संध्याकाळी उपस्थित राहणार आहोत."

शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ जूनला सोनाक्षी- झहीरच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे. सोनाक्षीच्या मैत्रीणीने दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षी- झहीरचं २३ जूनला रिसेप्शन होणार आहे. पण २२ जूनला किंवा २३ जूनला सकाळी लग्न करण्याची शक्यता आहे. अद्याप सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नानिमित्त दोघांच्याही घरी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सध्या दोघांच्याही घराच्या बाहेरील अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वजन वाढवायचंय? असं एका महिन्यात वाढवा तुमचं Weight

Mumbai Rain: ठाण्यात पावसाचा रेल्वे सेवेला फटका, लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या

Teacher's Recruitment Special Report: ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकांची भरती

Schools Closed Tomorrow: मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj Waghnakha: "ती" वाघनखं महाराजांची नाहीत?

SCROLL FOR NEXT