Shahrukh Khan: शाहरुख खानची कॉलेजमधील मार्कशीट व्हायरल; कॉलेजमध्ये असताना गणितात मिळाले 'इतके' मार्क्स Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरुख खानची कॉलेजमधील मार्कशीट व्हायरल; गणितात मिळाले होते 'इतके' मार्क्स

Shahrukh Khan: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान चित्रपटसृष्टीत स्टार आहेच. पण, तो शाळा आणि महाविद्यालयात तितकाच हुशार विद्यार्थी होता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्याची कॉलेजमधील मार्कशीट व्हायरल झाली आहे.

Shruti Vilas Kadam

Shahrukh Khan: बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान त्याच्या कॉलेजमधील मार्कशीटचा एक नवीन फोटो समोर आला आहे. त्याची ही मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या शाहरुख खानला किती मार्क मिळले ते स्पष्टपणे दिसत आहे. जाणून घेऊयात किती गुण मिळाले होत शाहरुख खानला

व्हायरल झालेला फोटो हंसराज कॉलेजचा आहे, जिथे शाहरुख खानने १९८५ ते १९८८ दरम्यान अर्थशास्त्रात पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. व्हायरल मार्कशीटनुसार, अभिनेता ९२ गुणांसह सर्वाधिक गुण मिळवून उत्तर्ण झाला होता. इंग्रजीमध्ये त्याला ५१ गुण मिळाले आहेत, तर गणित आणि भौतिकशास्त्रात त्याला प्रत्येकी ७८ गुण मिळाले आहेत.

Shahrukh Khan

शाहरुख खानची मार्कशीट

सोशल मीडियावर त्याच्या मार्कशीटचे कौतुक करणाऱ्या आणि कॉलेज ते अभिनेताच्या त्याच्या प्रवासाचे कौतुक करणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी हे मार्कशीट त्याच्या चिकाटी आणि प्रगतीच्या कथेत आणखी एक अध्याय असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

शाहरुख खानच्या कामाच्या बाबतीत सांगायचे झाले तर, शाहरुख त्याच्या पुढील चित्रपट "किंग" ची तयारी करत आहे. या चित्रपटामध्ये तो त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक त्याच्या वाढदिवशी प्रदर्शित झाली असून लवकरच त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : सोलापूरमध्ये भाजपचा डंका, प्रभाग २३ मध्ये पक्षाचे सर्व उमेदवार विजयी

Weight Loss : ना व्यायाम, ना डाएट; फक्त 'ही' एक ट्रिक वापरून वजन होईल झटपट कमी

Makeup Tips: मेकअप करायला शिकताय? मग तुमच्या चेहऱ्याला कोणता फाउंडेशन सूट करेल जाणून घ्या

Bmc Election Result: मुंबईत कोणाची सत्ता? कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर? जाणून घ्या

राज ठाकरेंचं इंजिन सुसाट! राज्यात मनसेने खातं उघडलं, 2 उमेदवारांचा दणदणीत विजय|VIDEO

SCROLL FOR NEXT