Shah Rukh Khan Twitter  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: ५७ वर्षीय शाहरुखने दिला चाहत्यांना कानमंत्र, ट्वीट करत म्हणतो 'मला वाटतं आयुष्यही...'

या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खुद्द शाहरुख खानही भारावून गेला आहे.

Chetan Bodke

Shah Rukh Khan: सध्या सर्वत्र 'पठान'ची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटाप्रमाणे त्यातील कलाकारांचीही चर्चा कायम आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींचा गल्ला जमावला. तब्बल चार वर्षानंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाला मिळालेले प्रेम पाहून खुद्द शाहरुखचा भारावला.

या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खुद्द शाहरुख खानही भारावून गेला आहे. शाहरुखने कमबॅकबद्दल एक ट्वीट करत चाहत्यांना एक सक्सेस मंत्र दिला आहे, जे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पठान चित्रपटातून शाहरुख तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करतोय. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून चित्रपटाचे अनेक ठिकाणी शोही वाढवण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात १०० हून अधिक कोटींची कमाई केली होती. तर आतापर्यंत चित्रपटाने ३०० कोटींच्या आसपास कमाई केली. नुकतेच शाहरुखने आपल्या चाहत्यांना ट्विट करत यशस्वी होण्यासाठी खास टीप दिली आहे.

शाहरुखने १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला Gattaca चित्रपटातील डायलॉग ट्वीट केलाय. तो ट्वीट करत म्हणतो, “Gattaca चित्रपट “मी परत येण्यासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाही.” मला वाटतं आयुष्यही असंच असतं. तुमचं पुनरागमन तुम्हाला ठरवण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त पुढे जायचं असतं. मागे फिरुन पुन्हा स्वत:ला पाहू नका, तुम्ही जे सुरू केले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ५७ वर्षाच्या मी तुम्हाला सल्ला देत आहे. ” त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांसह काही कलाकारांचीही प्रतिक्रिया येत'' आहे.

येत्या आगामी काळात शाहरुखचा हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT