Kangana Ranaut: 'पठान'च्या आडून कंगनाचा अचूक निशाणा; म्हणाली, राजकारणापासून दूर राहा नाही तर...

कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला निशाण्यावर धरले आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Saam TV

Kangana Ranaut: जवळपास दीड वर्षानंतर ट्विटरवर पुनरागमन केल्यानंतर कंगना रणौत सध्या जोमात दिसत आहे. ट्विटरवर पुन्हा एकदा अभिनेत्रीची तीच जुनी शैली पाहायला मिळत आहे. कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला निशाण्यावर धरले आहे. ती सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर सतत ट्वीट करत आहे, त्याचा किंग खानला कोणताच फरक पडत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा शाहरुखच्या चित्रपटाला लक्ष करत हिंदू धर्माचा नारा दिला आहे. यासोबतच बॉलिवूडला पुन्हा एकदा धमकीही दिली आहे.

Kangana Ranaut
Pathan 3 Day: 'पठान'ची गती मंदावली, तिसऱ्या दिवशी मोडू शकला नाही बाहुबली 2- दंगलचा रेकॉर्ड

नुकताच प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांतच अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. चाहते तसेच संपूर्ण चित्रपटसृष्टी 'पठान'ला मिळालेल्या यशाचे जंगी सेलिब्रेशन करत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडला टार्गेट करणारी एक व्यक्ती आहे. ती म्हणजे कंगना राणौत.

Kangana Ranaut
Shah Rukh Khan: 'पठान'च्या अभूतपुर्व यशानंतर शाहरुखची आगामी चित्रपटासाठी जोमात तयारी, ॲक्शनपटासाठी बनवला खास विग...

या अभिनेत्रीला ना 'पठान'च्या यशाचा आनंद आहे ना चित्रपटाच्या चाहत्यांचा आनंद. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने ट्वीटरच्या माध्यमातून बॉयकॉट करत चित्रपटाच्या चाहत्यांना चांगलेच फटकारले आहे. यावेळी कंगनाने शाहरुखच्या चाहत्यांना 'राजकारण'पासून दूर राहण्याचा एक योग्य सल्ला दिला आहे. कंगनाचे हे ट्विट शाहरुखच्या चाहत्यांसाठी धमकीसोबतच सल्लाही म्हणता येईल.

Kangana Ranaut
Ranbir Kapoor Video: अ‍ॅनिमलच्या सेटवरील रणबीर कपूरचा व्हिडिओ लीक, चाहत्यांमध्ये वाढली चित्रपटाविषयी उत्सुकता

'पठाण'च्या यशानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आनंद व्यक्त करत आहेत. यासोबतच करण जोहर आणि आलिया भट्ट सारखे इंडस्ट्रीतील कलाकार आणि दिग्दर्शक या चित्रपटाच्या यशाला 'द्वेषावरचा विजय' म्हणत आहेत, जे कंगनाला फारसे पटले नाही.

Kangana Ranaut
Ali Fazal on 'Fukrey 3': 'फुकरे 3'मधून अली फजलचा पत्ता कट, अभिनेत्यानेच सांगितले चित्रपटामध्ये न दिसण्याचे कारण

कंगनाने बॉलिवूडला आणि इंडस्ट्रीतील लोकांना 'तुमच्या यशाचा आनंद घ्या' आणि 'राजकारणापासून दूर राहा' असे म्हणत तिने ट्वीट केले. कंगनाने ट्विट करून लिहिले की, 'बॉलिवूडकरांनो, तुम्ही या देशातील हिंदूंच्या द्वेषाने त्रस्त आहात, जर मी 'द्वेषावर विजय' हे शब्द पुन्हा ऐकले, तर पुन्हा एकदा तुमच्यावर काल सारखी वेळ येण्याची शक्यता आहे. तर तुमच्या यशाचा आनंद लुटा आणि राजकारणापासून अलिप्त रहा.'

Kangana Ranaut
Ranbir Kapoor: रणबीर कपूरला झालं तरी काय? सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा मोबाइल रागानं फेकला, नेटकरी भडकले

कंगना 'पठान'च्या यशावर मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडिया युजर्सला ते स्पष्टपणे दिसत आहे. हे सोशल मीडियावर अनेक युजर्सचे मत आहे. कंगना रणौत 'पठान' बद्दल ट्विट करण्यात व्यस्त असताना, दुसरीकडे कंगना तिचा आगामी'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे, ज्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com