Ketaki Mategaonkar
Ketaki MategaonkarInstagram @ketakimategaonkar

Marathi Movie: प्रेमवेड्या केतकीचे चित्रपटसृष्टीत पुन्हा पदार्पण, नवा चित्रपट घेऊन लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

केतकी माटेगावकर बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
Published on

Ketaki Mategaonkar New Movie: गायनाने आणि अभिनयाने साऱ्यांना वेड लावणारी केतकी माटेगावकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. केतकीने 'शाळा' या चित्रपाटातून चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. या चित्रपटातील 'शिरोडकर' हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. केतकीने नुकतीच तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

Ketaki Mategaonkar
Pathan 3 Day: 'पठान'ची गती मंदावली, तिसऱ्या दिवशी मोडू शकला नाही बाहुबली 2- दंगलचा रेकॉर्ड

केतकीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे. 'मीरा' असे केतकीच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. केतकीने क्लॅप देतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओ कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, 'आणि नवीन वर्ष सुरूवात झाली... हा चित्रपट माझ्या प्रियजणांसाठी.' या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार दिवेकर असल्याचे देखील केतकीने सांगितले आहे.

केतकी जरी बऱ्याच कालावधीनंतर मराठी चित्रपटांमध्ये दिसत आहे. परंतु ती गायिका म्हणून सक्रिय आहे आणि अनेक संगीताचे कार्यक्रम ती करत असते. 'पक्का पक्का यार' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. हे तिचे पहिले पंजाबी गाणे होते.

केतकी माटेगावकर 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आली. त्यानंतर तिने शाळा, तानी, टाईमपास, टाईमपास २', फुंतरू अशा मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com