Jawan Twitter Review Instagram @redchilliesent
मनोरंजन बातम्या

Jawan Twitter Review: रिलीज होताच ‘जवान’ सुसाट, थिएटरबाहेर गर्दी करत चाहत्यांचा जल्लोष; सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Chetan Bodke

Jawan Twitter Review

अखेर बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कायमच चर्चेत राहिलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाला पहिल्याच दिवसापासून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरजवळ पहाटेपासूनच एकच गर्दी केली आहे. प्रेक्षक चित्रपटाला सोशल मीडियावर कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत, चला तर जाणून घेऊया...

शाहरुखचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटल्यावर चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. प्रेक्षक सकाळी फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी खूपच आतुरलेले आहेत. इतकंच नाही तर शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटरच्या बाहेर लाडक्या अभिनेत्याच्या नावाच्या घोषणा देत जल्लोष केला साजरा केला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक युजर्स किंग खानच्या या चित्रपटाचं तोंड भरुन कौतुक करत आहे.

भारतात चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरात चित्रपटाचे तिकीटं ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत विकली जात आहेत. उत्तर प्रदेशमधील मालेगाव शहरात ॲडव्हान्स बुकिंगसाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर भली मोठी रांग लावली आहे. मध्यरात्री २ वाजता फॅन्सने थिएटर बाहेर तिकीट खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जवानाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक आहे. शाहरुख खानला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहिल्यावर त्याचे फॅन्स थिएटरच्या बाहेर एकच जयघोष करत नाचताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्स आपला व्यक्त करताना दिसत आहे. एका युजरने प्रतिक्रिया दिली की, ‘जवान’च प्रतिसाद अतुलनीय आहे. एवढ्या पहाटे कोणत्याच चित्रपटाला प्रतिसाद मिळालेला नाही. तर आणखी एकाने, मेगा ब्लॉकबस्टर म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, किंग खानच्या स्वॅगचा आणि एनर्जीला तोड नाही, ‘जवान’ खूपच जबरदस्त चित्रपट आहे. दमदार कथा, उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्शन स्टंट, अवश्य पहा.

चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ आज अर्थात ७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT