HBD Radhika Apte: अभिनेत्री व्हायचे स्वप्न राधिका झाली OTT क्वीन; करिअरमधून ब्रेक घेत बांधली लग्नगाठ

Birthday special :राधिका आज तिचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे.
HBD Radhika Apte
HBD Radhika Apte Saam Tv

Radhika Apte Career and Love Life

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून राधिका आपटेला ओळखले जाते. राधिकाने बॉलिवूडसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली छाप पाडली आहे. राधिका आज तिचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. राधिका नेहमीच चित्रपटांमुळे चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला तिच्या लव्ह-लाईफबद्दल सांगणार आहोत.

राधिका आपटेचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी झाला. तिने फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणित विषयांत पदवी घेतली आहे. पुण्यात राहूनच ती रंगभूमीशी जोडली गेली. त्यानंतर ती मुंबईत आली. राधिकाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. राधिका अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगणा आहे. राधिकाने कथ्थक शिकले आहे.

HBD Radhika Apte
Celebrity Fashion: चेहरा न बघताही तुम्ही ओळखाल, अतरंगी अवतारात आली मॉडेल

राधिकाने २००५ मध्ये 'वाह लाइफ' या चित्रपटातून डेब्यू केलं. 'शोर इन द सिटी' हा तिचा प्रमुख भूमिकेतील पहिला चित्रपट होता. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज तिला 'ओटीटीची क्वीन' म्हणून ओळखले जाते. राधिकाने तिच्या करिअरमध्ये ब्रेक घेत लंडनमध्ये नृत्याचे शिक्षण घेतले.

लंडनमध्ये राहून राधिकाचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले. लंडनमध्येच राधिकाच्या लव्ह लाईफला सुरुवात झाली. लंडनमध्येच राधिकाची भेट संगीतकार बेनेडिक्टशी झाली. त्यांच्यात प्रेम बहरले. या दोघांनीही २०१२ मध्ये गुपचून लग्न उरकले. परंतु, २०१३ मध्ये तिने आपल्या लग्नाचा खुलासा केला. सोशल मीडियावरुन ही माहिती राधिकाने सर्वांना दिली. विशेष म्हणजे, राधिकाचे लग्नातील एकही फोटो नाही आहे.

HBD Radhika Apte
Sukhee Trailer Out: बिनधास्त, बेधडक गृहिणी भूमिकेत दिसणार शिल्पा शेट्टी; 'सुखी'चा कॉमेडी पण इमोशनल ट्रेलर प्रदर्शित

राधिका आपटेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, राधिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु राधिकाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरीजला जास्त प्रतिसाद मिळत आहे. राधिकाची 'फॉरेन्सिक', 'मिसेस अंडरकव्हर', 'मेड इन हेवन 2' या वेबसीरीजला प्रेक्षकांची कमालीचा प्रतिसाद दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com