Sukhee Trailer Out: बिनधास्त, बेधडक गृहिणीच्या भूमिकेत दिसणार शिल्पा शेट्टी; 'सुखी'चा कॉमेडी पण इमोशनल ट्रेलर प्रदर्शित

Shilpa Shetty Upcoming Movie: 'सुखी' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
Sukhee Trailer Out
Sukhee Trailer OutInstagram @theshilpashetty

Shilpa Shetty, Kusha Kapila Movie Sukhee Trailer Released:

शिल्पा शेट्टी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. तिचा 'सुखी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये कुशा कपिला, अमित साध, चैतन्य चौधरी, दिलनाझ इराणी, पावलीन गिजरल, किरण कुमार आणि विनोद नागपाल हे कलाकार आहेत.

'सुखी' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चला पाहूया कसा आहे चित्रपटाचा ट्रेलर?

Sukhee Trailer Out
Celebrity Fashion: चेहरा न बघताही तुम्ही ओळखाल, अतरंगी अवतारात आली मॉडेल

ट्रेलरमधील सुखी कालरा ही ३८ वर्षीय पंजाबी गृहिणी आहे. चित्रपटाची कथा तिच्या भोवती फिरते. २० वर्षांनी तिच्या शाळेतल्या मैत्रिणी तिच्या संपर्कात येतात. आणि सगळ्याजणी मिळून दिल्लीला भेटायचं ठरवतात.

परंतु सुखींच्या घरी तिचेच संपूर्ण कुटुंब असतं. तिचा नवरा, १७ वर्षाची मुलगी, सासू-सासरे यांना सोडून जाणं तिला शक्य नसत. तिचा नवरा देखील तिला यासाठी विरोध करतो. सुखी एक दिवस अचानक गायब होते आणि ती तिच्या मैत्रिणींना जाऊन भेटते.

सगळ्याजणी मिळून धम्माल करतात आणि सुखी तिचा आयुष्य पुन्हा जगते असं सुखींच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलं आहे. (Latest Entertainment News)

शिल्पा शेट्टीने चित्रपटाचा ट्रेलर तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'सुखी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा!' शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर नेकरी आणि सेलिब्रिटी कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

या दरम्यान सुखीच्या घरी आणि तिच्या अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बदल होतात. फुल्ल मनोरंजक आणि कॉमेडी तितकाच भावनिक असा सुखीच ट्रेलर आहे.

सुखी चित्रपट सोनल जोशीने दिग्दर्शित केला आहे. तिचे हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com