बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले आहे. 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' हे नाव बदलून आता 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' केले आहे.
चित्रपटाच्या नावातील हा बदल सध्या सुरू असलेल्या इंडिया की भारत या चर्चांदरम्यान करण्यात आला आहे.
या चित्रपटाचे मोशन पोस्टर अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या मोशन पोस्टरमधेय तुम्ही अक्षय कुमारला मायनींग इंजिनिअर जसवंत सिंगच्या भूमिकेत पाहू शकता. हा चित्रपट जसवंत सिंग आणि त्याच्या धैर्यावर आधारित आहे. १९८९साली जसेवनात सिंग यांनी जमिनीच्या ३५० फूट खाली असलेल्या ६५ लोकांना वाचवले होते.
ही घटना बिहारमधील रानीगंज येथे घडली होती. या घटनेला मिशन रानीगंज या नावाने देखील ओळखले जाते. या चित्रपटाचे नाव 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असे होते. परंतु अक्षय कुमारने शेअर केलेल्या काही पोस्टर आणि मोशन पोस्टरमध्ये चित्रपटाचे नाव 'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. उद्या म्हणजे ७ सप्टेंबरला चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)
अक्षय कुमारने या चित्रपटाचे नाव पहिल्यांदा बदलले आहे असे नाही. गेल्यावर्षी जेव्हा चित्रपटाची घोषणा करण्यात अली होती तेव्हा या चित्रपटाचे नाव 'कॅप्सूल गिल' दिले होते. त्यानंतर 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' आणि आता 'मिशन रानीगंज; द ग्रेट भारत रेस्क्यू' करण्यात आले आहे. दरम्यान चित्रपटचो रिलीज डेट देखील जाहीर करण्यात आली आहे. ६ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू' या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह परिणीती चोप्रा देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिगदर्शन टिनू सुरेश देसाईने केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.