मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीपासून सुरू केलेला मोर्चा लवकरच मुंबईत दाखल होणार आहे. या मोर्चाला राज्यातील मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक सेलिब्रिटी आपलं मत मांडताना दिसत आहे. अशातच नुकतीच 'आई कुठे काय करते' फेम आश्विनी महांगडे हिने मनोज जरांगेंबद्दल एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यामतून तिने आंदोलनाला थेट आपला पाठिंबा दर्शवला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा एक फोटो शेअर करत अश्विनी महांगडेने पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही लिहिलं आहे. अश्विनी महांगडेने पोस्टमध्ये लिहिलंय की, "साधं फिरायला जावून घरी परतलो तरी २ ते ३ दिवस "फार दमलो" म्हणत काढतो आपण. पण हा माणूस.. एक भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं. आलेल्या हजारो संकटांना या माणसाने याच्या सहज बोलण्याने, खरेपणाने परतवून लावले. आज लाखो मुलांच्या डोळ्यात एक स्वप्नं आहे की आता तरी न्याय मिळेल." (Maratha Aarakshan)
अभिनत्री पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणते, "हा विश्वास या माणसाने त्याच्या आरक्षणाप्रती असलेल्या सातत्याने, समाजाप्रती असलेल्या प्रेमाने निर्माण केला, टिकवला, वाढवला. म्हणूनच आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते. हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल." (Marathi Film)
"टीप - माझे कलाकार म्हणून काम पाहणारे आणि माझ्यावर प्रेम करणारे हे एका समाजाचे नाहीत तर ते १२ बलुतेदार १८ पगड जातीचे आहेत. आज मी मराठा आंदोलनात सहभाग दर्शवणे म्हणजे त्या सगळ्या लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय व्हावा असे अजिबात नाही, समाजातील सर्वच घटकांना समान न्याय मिळावा हेच माझे मत." (Marathi Actress)
आश्विनी महांगडे मराठी सिनेसृष्टीतील नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत तिने अनघा नावाचे पात्र साकारले आहे. सोबतच आतापर्यंत आश्विनीने अनेक कलाकृतींमध्ये ऐतिहासिक पात्र साकारले. मुख्य बाब म्हणजे, ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातही आश्विनी झळकली असून तिने चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून आश्विनी महांगडेची खास ओळख असून ती कायमच सोशल मीडियावर आपली ठामपणे विचार मांडत असते. (Social Media)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.