Chetan Bodke
‘आई कुठे काय करते’ फेम आश्विनी महांगडे कायमच चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
अभिनायासोबतच ती आपल्या सामाजिक कार्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत राहते.
नुकतंच आश्विनीने सोशल मीडियावर लाल रंगाच्या पैठणीमध्ये नवे फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाची पैठणी, नो मेकअप लूक आणि केसात माळलेला चाफा असा तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीच्या सौंदर्याची नेहमीच चाहत्यांमधे चर्चा होते.
आश्विनीच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
आश्विनी नेहमीच बॉयफ्रेंड नीलेश जगदाळेसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते.
नीलेश फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेशचा मालक असून त्याने अश्विनीसोबत पार्टनरमध्ये ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनीदेखील सुरू केली आहे.
अश्विनीने मे महिन्यात नीलेशबरोबरच्या नात्याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली होती.