मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं हा मुद्दा उचलून धरून गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष करणारे मराठा समजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायाला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी डी गोवर्धन दोलताडे यांनी हा चित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती. शिवाजी दोलताडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आजपासून या चित्रपटाच्या शूटिंगला अंतरवाली सराटी (antarwali sarati) येथून सुरूवात झाली आहे.
संघर्षयोद्धा' या चित्रपटामध्ये मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास, मराठा आंदोलनात त्यांची भूमिका हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आजपासून सुरूवात झाली. यावेळी मनोज जरांगे पाटील, निर्माते, दिग्दर्शक आणि टीम उपस्थित होती. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ प्रदर्शित होणार आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
अभिनेता रोहन पाटील 'संघर्षयोद्धा' या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी रोहन पाटील, संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख हे देखील उपस्थित होते. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. तर शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
'संघर्षयोद्धा' या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आर्थिक सक्षमतेअभावी शिक्षण, रोजगारात मागे पडत असल्याने या समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणीसाठी 'एक मराठा, लाख मराठा' म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही.
या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील... आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यांना राज्यभरातून जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाच्या या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांच्या मनामध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.