Ram Mandir Inauguration: अयोध्येच्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण मिळूनही जाणार नाही Jr NTR, कारण आलं समोर...

Ram Mandir Pran Pratista Program: नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार ज्युनिअर एनटीआर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला हजर राहणार नाही. यामागचे कारण देखील समोर आले आहे. नेमकं कारण काय घ्या जाणून....
South Superstar Junior NTR
South Superstar Junior NTRSaam Tv
Published On

South Superstar Junior NTR:

22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला (Ram Mandir Inauguration) आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहे. या कार्यक्रमाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. या कार्यक्रमाकडे देशाचे नाही तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहेत.

राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड आणि टॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार रजनीकांत, चिरंजीवी, राम चरण, प्रभास आणि ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार ज्युनिअर एनटीआर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला हजर राहणार नाही. यामागचे कारण देखील समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनिअर एनटीआर (Jr NTR Movies) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवरा'च्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी शूटिंग शेड्यूल अनेक अ‍ॅक्शन सीन आणि महत्त्वपूर्ण शॉट्सने भरलेले आहे. अशास्थितीत ज्युनिअर एनटीआर अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाही, असे बोलले जात आहे.

Glute ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्युनियर एनटीआर यांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण मिळाले होते. परंतु तो या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही. असे म्हटले जात आहे की, अभिनेत्याच्या काही कमिटमेंट्स आहेत ज्या प्राधान्यावर आहेत. त्यामुळे तो या कार्यक्रमाला हजेरी लावू शकणार नाही. समोर आलेल्या वृत्तावर विश्वास ठेवला तर, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्युनियर एनटीआर सोबतच राम मंदिराच्या भव्य सोहळ्यासाठी निमंत्रितांच्या यादीत विराट कोहली, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनुपम खेर, अजय देवगण, रजनीकांत, प्रभास, धनुष, मोहनलाल, यश, ऋषभ शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

South Superstar Junior NTR
Sushmita Sen: -1 डिग्री सेल्सिअस तापमान..., सुष्मिता सेनने स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारत लावली आग, VIDEO व्हायरल

दरम्यान, ज्युनियर एनटीआरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता आरआरआर या चित्रपटानंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्युनियर एनटीआरचा देवरा हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अभिनेता व्यस्त आहे. ज्युनिअर एनटीआरच्या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.

South Superstar Junior NTR
Prithvik Pratap: स्वप्नांपासून… सत्यापर्यंत..! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापची आईसाठी खास पोस्ट, म्हणाला - 'हार नाही मानणार…'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com