Shaitaan Poster Out: अजय देवगणच्या 'शैतान'चे पोस्टर आऊट, चित्रपटाची रिलीज डेटही केली जाहीर

Ajay Devgn And R Madhavan Shaitaan Movie: अजय देवगण शैतान या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपाटाचे पोस्टर आऊट झाले आहे. त्याचसोबत या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.
Ajay Devgn Shaitaan Movie Poster
Ajay Devgn Shaitaan Movie PosterSaam Tv
Published On

Shaitaan Poster Released:

बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सिंगम अगेन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या नव्या वर्षात त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासोबत आता अजय देवगणच्या हातामध्ये आणखी एक प्रोजेक्ट आला आहे. अजय देवगण 'शैतान' चित्रपटाच्या (Shaitaan Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण शैतान या सुपरनॅच्युरल थ्रिलर चित्रटामध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपाटाचे पोस्टर आऊट झाले आहे. त्याचसोबत या चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.

अजय देवगणने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शैतान चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करत अजय देवगणने रिलीज डेटवरचा पडदा हटवला आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'शैतान तुमच्यासाठी येत आहे. चित्रपट ९ मार्चला रिलीज होणार.' या चित्रपटचे पोस्टर पाहून प्रेक्षक टीझर आणि ट्रेलर रिलीज पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

शैतान चित्रपटामध्ये अजय देवगण आणि आर माधवन आमने-सामने येणार आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. शैतान हा गुजराती चित्रपट 'वश'चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवण्यात येणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Ajay Devgn Shaitaan Movie Poster
Bigg Boss 17: 'मी तुमच्या कॅटेगिरीची नाही...', अंकिता- विकीमध्ये पुन्हा उडाले खटके, ढसाढसा रडली अभिनेत्री

अजय देवगण हा बॉलिवूडचा असा कलाकार आहे ज्याच्या हातामध्ये सध्या अनेक चित्रपट आहेत. यावर्षामध्ये अजय देवगण अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आतापर्यंत त्याच्या हातामध्ये ४ चित्रपट आहेत. 'शैतान' चित्रपटाव्यतिरिक्त अजय देवणकडे 'सिंघम अगेन', 'रेड २' आणि 'मैदान' यासारखे चित्रपट हातामध्ये आहेत. या चित्रपटांमध्ये तो दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे.

Ajay Devgn Shaitaan Movie Poster
Shahid Kapoor आणि Kriti Senon एकमेकांच्या प्रेमात झाले वेडे, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चा दमदार ट्रेलर आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com