Shahid Kapoor आणि Kriti Senon एकमेकांच्या प्रेमात झाले वेडे, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चा दमदार ट्रेलर आऊट

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer Out: काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून त्याची घोषणा करण्यात आला होती. तेव्हापासून या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली. आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya TrailerSaam Tv
Published On

Shahid Kapoor And Kriti Sanon Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Senon) सध्या त्यांच्या आगामी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie) या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद आणि क्रिती पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. दोघांच्याही चाहत्यांना या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता आहे.

या दोघांची एकत्र दमदार केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून त्याची घोषणा करण्यात आला होती. तेव्हापासून या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली. आता या चित्रपटाचा ट्रेलरही (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer Out) रिलीज करण्यात आला आहे.

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटामध्ये कृती सेनॉन रोबोट झाली आहे. तर शाहिद कपूर रोबोटिक्सचा स्पेशालिस्ट झाला आहे. अशातच शाहिद रोबोट झालेल्या क्रितीच्या प्रेमात पडतो. २ मिनिटे ५६ सेकंदांचा या चित्रपटाचा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून चित्रपटाची कथा स्पष्टपणे समजू शकते. शाहिद आणि क्रितीची प्रेमकथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा ट्रेलरमध्ये काही क्षण असे आहेत जे पाहून तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते की शाहिदला कळते की त्याला जी मुलगी आवडते ती रोबोट आहे. क्रितीने चित्रपटात सिफ्रा नावाच्या रोबोटची भूमिका साकारली आहे. जी अमेरिकेत राहते आणि आता ती एका भारतीय कुटुंबाची सून होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक उत्तम कथा पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे शाहिद आणि क्रिती ही बॉलिवूडची फ्रेश ऑन-स्क्रीन जोडीची जबरदस्त केमिस्ट्री सर्वांना पाहायला मिळणार आहे.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer
Bigg Boss 17: 'मी तुमच्या कॅटेगिरीची नाही...', अंकिता- विकीमध्ये पुन्हा उडाले खटके, ढसाढसा रडली अभिनेत्री

ट्रेलरवरूनच अंदाज लावला जाऊ शकतो की या चित्रपटात अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असणार आहे. या चित्रपटाला कौटुंबिक चित्रपट म्हणणे थोडे कठीण जाईल. कारण ट्रेलरमध्येच क्रिती आणि शाहिदमध्ये खूप बोल्ड सीन्स दिसत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक खूपच आनंदी झाले आहेत. आता ते चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत.

या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्याच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. अमित जोशी आणि आराधना साह हे 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. व्हॅलेंटाईन वीकमध्ये ९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Trailer
Ram Mandir Inauguration: अयोध्येच्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण मिळूनही जाणार नाही Jr NTR, कारण आलं समोर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com