Scam 2003–The Telgi Story Trailer Shared On Social Media Saam Tv
मनोरंजन बातम्या

Scam 2003–The Telgi Story Trailer: Scam 2003 ची जादू चालणार का? तेलगी स्टोरीचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Scam 2003–The Telgi Story Trailer Out: नुकताच Scam 2003–The Telgi Story या वेबसीरिजचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Scam 2003–The Telgi Story Trailer Shared On Social Media

ऑक्टोबर २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्कॅम १९९२’ (Scam 1992) या हिंदी वेबसीरिजने देशातल्या सर्वच लोकांचे लक्ष वेधले होते. शेअर बाजारात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यावर या वेबसीरिजची कथा आधारित होती. आता पुन्हा एकदा ओटीटीवर ‘स्कॅम १९९२’नंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.

हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना पत्रकार संजय सिंह यांच्या 'रिपोर्टर्स डायरी' या हिंदी पुस्तकातून घेण्यात आली आहे.

शेअर करण्यात आलेल्या ट्रेलमध्ये २००३ मधील मुंबईतील एक घटना दाखवली आहे. स्कॅम २००३ च्या ट्रेलरमध्ये, सर्वात आधी अब्दुल करीम तेलगीच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून राजकीय मंडळींपर्यंत त्याच्या नावाची चर्चा होताना दिसतेय.

अब्दुल तेलगी पुढे स्टॅम्प घोटाळा कशाप्रकारे करतो, याची कथा दाखवण्यात आली आहे. सोबतच राजकीय मंडळींपर्यंत त्याच्या नावाची ही कशाप्रकारे चर्चा होते, हे सुद्धा दाखवण्यात आला आहे. अब्दुल करीम तेलगीने २००३ मध्ये केलेला ३०,००० कोटींचा घोटाळा कशा प्रकारे समोर येतो, हे आपल्याला येत्या १ सप्टेंबरलाच कळणार आहे.

अब्दुल करीम तेलगीबद्दल सांगायचे तर, तो स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मास्टरमाईंड होता. करीमचा हा घोटाळा जवळपास १६ राज्यांमध्ये पसरलेला होता. अब्दुलने २००३ मध्ये सुमारे ३० हजार कोटींचा बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा केला होता. २००१ मध्ये त्याला अजमेरमधून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला ३० वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा मिळाली होती आणि त्यासोबतच २०२ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. २३ ऑक्टोबर २०१७ रोजी वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचं एका अल्पशा आजारामुळे निधन झाले होते.

२ सप्टेंबर २०२३ ला ही वेबसीरिज ‘सोनी लीव्ह’ (Sony Liv) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता गगन देव या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा हंसल मेहता आणि तुषार हिरनंदानी यांच्याकडे आहे. ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ ची निर्मिती समीर नायर यांच्या Applause Entertainment द्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंदाकिनी खामकर यांची संधी हुकली!

PM Surya Ghar Yojana: सोलर पॅनेल, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज अन् ७८००० रुपयांची सब्सिडी; सरकारची सूर्य घर योजना आहे तरी काय?

Gold Rate Today : २०२५ चा शेवट गोड! सोनं आणि चांदीचे दर घसरले, वाचा गोल्ड किती झालं स्वस्त

Dining Table Desing : नवीन किचनसाठी डायनिंग टेबलच्या शोधात आहात? मग जाणून घ्या ८ बेस्ट डायनिंग टेबल डिझाईन

Fish Fry: मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे? ही आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT