Gadar 2 OTT Released: बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘गदर २’ लवकरच ओटीटीवर; कधी आणि कुठे पाहता येणार

Gadar 2 Release On OTT: थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा सनी देओल आणि अमिशा पटेलचा ‘गदर २’ चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT Release
Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT ReleaseSaam Tv
Published On

Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT Release

सनी देओल आणि अमिशा पटेल अभिनित ‘गदर २’ चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने बॉक्स ऑफिसवर गर्दी करत आहेत. चित्रपटाने नुकताच ३०० कोटींचा आकडा पार केला असून लवकरच ४०० कोटींच्या देखील तो क्लबमध्ये सामील होणार आहे. अनेकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला आहे, ते OTT वर पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT Release
Sunny Deol Reaction On Bank Auction: 56 कोटींच्या कर्जावर अखेर सनी देओल मौन सोडले; म्हणाला 'मी काहीही बोललो तर...'

अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या काही दिवसातच अनेक विक्रम मोडले आहेत. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट OTT वर देखील अनेक नवे रेकॉर्ड मोडित काढेल. पण प्रेक्षकांना 'गदर २' ओटीटीवर पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार आठवड्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. पण 'गदर २' च्या निर्मात्यांनी चित्रपटासाठी वेगळी योजना आखली आहे.

'गदर २'च्या निर्मात्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, " 'गदर २' हा चित्रपट ओटीटीवर आणखी दोन महिन्यांनी प्रदर्शित होणार आहे. अद्याप ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तारीख जाहीर झालेली नाही. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'झी 5' (Zee 5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. थिएटरप्रमाणेच ओटीटीवरसुद्धा सनी देओल आणि अमिशा पटेल यांचा हा चित्रपट चांगलाच धमाका करेल."

Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT Release
Meera Joshi Boyfriend: आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली...

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'गदर २' पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे पठान, बाहुबली 2, केजीएफ २, दंगल, संजू, पीके, टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान, वॉर या चित्रपटांप्रमाणे 'गदर २' हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार करेल. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'गदर २' चित्रपटाला ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Sunny Deol Ameesha Patel Gadar 2 OTT Release
Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे 'यारियां 2'मधील गाणे घालणार धुमाकूळ; चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित

११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर आपल्या कमाईबाबतीचा आलेख चढता कायम ठेवला आहे. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली’, ‘पठान’ चा रेकॉर्डही मोडीत काढला आहे. पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन सध्या दुसरा आठवडा सुरू असून कमाईबाबतीचा आलेख चढता कायम ठेवला आहे. ७५ कोटींच्या बजेटमध्ये निर्मित केलेल्या या चित्रपटाचे थिएटरमध्ये शो हाऊसफुल्ल आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. एकंदरीतच चित्रपटाने प्रदर्शानाच्या ११ दिवसापर्यंत ३८९ कोटींचा गल्ला जमवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com