Meera Joshi Boyfriend: आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली...

Meera Joshi News: एका मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुख:द धक्का दिलाय.
Meera Joshi Shared Boyfriend Photo
Meera Joshi Shared Boyfriend PhotoInstagram
Published On

Meera Joshi Shared Boyfriend Photo

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात नेमकं काय घडतंय याची माहिती जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणारे सेलिब्रिटी नेमकं काय पोस्ट करताय?, त्यांची ती पोस्ट शेअर करण्यामागील हेतू काय? अशा अनेक प्रश्नांचा विचार कायमच चाहते करत असतात.

सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रेमाचे वारे वाहत आहेत. मध्यंतरी अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली दिली. सर्वात आधी मुग्धा- प्रसादने, नंतर स्वानंदी- आशिषने तर, काही दिवसांनी बिग बॉस फेम अमृता- प्रसादने देखील आपल्या प्रेमाची कबुली दिली.

काही विवाहबंधनात अडकले तर काहींनी साखरपुडा उरकला. अशातच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेमाची कबुली देत चाहत्यांना सुख:द धक्का दिलाय.

Meera Joshi Shared Boyfriend Photo
Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे 'यारियां 2'मधील गाणे घालणार धुमाकूळ; चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित

बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर चाहत्यांना मीरा जोशीने आपल्या प्रेमाची कबुली दिली. समुद्र किनाऱ्यावरील बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सुप्रसिद्ध अभिनेत्री मीरा जोशीने आपल्या नात्याची कबुली दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये नेमका तिचा बॉयफ्रेंड कोण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. शेअर केलेल्या फोटोत तिचा बॉयफ्रेंड पाठमोरा उभा आहे, त्यामुळे नेमका तो कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांना आहे. लवकरच ती बॉयफ्रेंडच्या नावाचा उलगडा करेल असे तिने सांगितले आहे.

Meera Joshi Shared Boyfriend Photo
Arun Kadam Son In Law Special Post: “आम्हाला आणि आमच्या बाळाला…”, बाळाच्या जन्मानंतर हास्यजत्रा फेम अभिनेते अरुण कदम यांच्या जावयाची पोस्ट चर्चेत

मीरा जोशी एक उत्तम अभिनेत्री असून ती उत्तम नृत्यांगना देखील आहे. मीराने आपल्या सिनेकारकिर्दित 'कुलस्वामिनी', 'प्रेमा तुझा रंग कसा', 'तुझं माझं ब्रेकअप' या टेलिव्हिजन मालिकेंच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडली. सोबतच ती 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमातही झळकली होती. तर अभिनेत्रीने चित्रपटातही काम केले आहे. 'चालू द्या तुमचं', 'शिवा', 'वृत्ती', 'लाल बत्ती', 'माझ्या बायकोचा प्रियकर' अशा अनेक चित्रपटातून मीराने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com