Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे 'यारियां 2'मधील गाणे घालणार धुमाकूळ; चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित

Yaariyan 2 Teaser: 'यारियां 2'मधील 'सौर घर' गाण्याचा टीझर प्रदर्शित.
Saure Ghar Song Teaser Out
Saure Ghar Song Teaser Out Saam TV
Published On

Saure Ghar Song Teaser Out Yaariyan 2:

यारियां 2 च्या टीझरने लोकांमध्ये चित्रपटाविषयी खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल चित्रपटातील "सौरे घर"चे पहिले गाणे 27 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये गाण्यांसह सनी सनी गाण्याची झलक होती. परंतु याशिवाय चित्रपटात आणखीही अनेक मनोरंजक गाणी आहेत जी नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. 'सौरे घर'चा टीझर पाहता, हा एक भन्नाट डान्स नंबर आहे, जे तुम्हाला थिरकायला भाग पडेल.

Saure Ghar Song Teaser Out
Karan Kundrra - Tejasswi Prakash: करण कुंद्रा - तेजस्वी प्रकाशने गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोमुळे जोडप्याचे गुपित उघड

या चित्रपटात चुलत भाऊ-बहीण यांच्यातील जबरदस्त बाँडिंग दाखवण्यात आले आहे. जे तुम्हाला चित्रपटात गुंतवून ठेवेल. 'यारियाँ 2' मध्ये दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी, यश दासगुप्ता, अनस्वरा राजन, वारिना हुसैन आणि प्रिया वारियर आहेत. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

गुलशन कुमार आणि टी-सीरीज टी-सीरीज फिल्म्स आणि राव आणि सप्रू फिल्म्स प्रोडक्शन यारियां 2 सादर करतात. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या खोसला कुमार आणि आयुष महेश्वरी निर्मित, राधिका राव आणि विनय सप्रू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हा चित्रपट उत्तम संगीतासह ड्रामा, इमोशन आणि कॉमेडी यांचे संपूर्ण पॅकेज आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांचा म्युजिकल परफॉर्मन्स दाखवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये कुटुंबातील मित्राचा आणि मित्रातील कुटुंब हे दाखविण्यात आले आहे. यारियां 2 प्रेम, भावना आणि मैत्री नव्याने दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com