Sayali Sanjeev-Shashank Ketkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sayali Sanjeev-Shashank Ketkar : सायली-शशांकच्या केमिस्ट्रीची चर्चा; 'कैरी' सिनेमाचे गाणं रिलीज, कोकणात झालंय शूटिंग- VIDEO

Kairee Movie New Song Released : 'कैरी' चित्रपटातून सायली संजीव आणि शशांक केतकर एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चित्रपटातील एक रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे.

Shreya Maskar

सायली संजीव आणि शशांक केतकर यांचे रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे.

सायली आणि शशांक 'कैरी' चित्रपटातून एकत्र आले आहेत.

'कैरी' चित्रपटातील नवीन गाण्याचे शूटिंग कोकणात झाले आहे.

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. उन्हाळ्यात चाखायला मिळणारी 'कैरी' आता हिवाळ्यात चाखायला मिळणार म्हणून प्रेक्षक खूपच खुश आहे. तसेच चाहते सायली आणि शशांकला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. नुकतेच 'कैरी' चित्रपटातील 'नारळी पोफळीच्या बागा' हे गाणे रिलीज झाले आहे.

'नारळी पोफळीच्या बागा' हे रोमँटिक गाणे आहे. यात सायली संजीव आणि शशांक केतकर यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे कोकणात शूट झाले आहे. कोकणचा साज येथे पाहायला मिळत आहे.'नारळी पोफळीच्या बागा' या गाण्यात शशांक आणि सायली यांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या मनाला भावते. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेले जोडपे ते संसार हा रोमँटिक प्रवास येथे पाहायला मिळतो.

'कैरी' स्टार कास्ट

सायली संजीव आणि शशांक केतकरसोबतच 'कैरी' चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे दिग्गज कलाकार झळकले आहेत. रोमँटिक थ्रिलर 'कैरी' चित्रपट नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा आहे. सिनेमा प्रदर्शनापूर्वी 'नारळी पोफळीच्या बागा' या रोमँटिक गाण्याने चित्रपटाची उंची आणि उत्सुकता वाढवली आहे. या गाण्याचे गीत मनोहर गोलांबरे यांचे असून संगीताची जबाबदारी निषाद गोलांबरे यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाची रिलीज डेट?

सायली संजीव आणि शशांक केतकरचा 'कैरी' चित्रपट येत्या 12 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात शूट झालेलं 'नारळी पोफळीच्या बागा' हे गाणं आणि सायली-शशांकचा रोमँटिक केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसी महापौर पदासाठी रस्सीखेच

KDMC Mayor : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेचा महापौर कोण होणार? शिंदेंच्या या २ शिलेदारांची चर्चा

Pawar Family: मोठी बातमी! पवार कुटुंब एकत्र येणार? आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेणार?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय बोलणं झालं, प्रफुल्ल पटेलांनी सगळंच सांगितलं

Women Yoga Poses: हाडांच्या मजबुतीसाठी महिलांनी करा 'हे' 5 योगा, पन्नाशीनंतरही राहाल फिट

SCROLL FOR NEXT