शशांक केतकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. शशांक केतकरने दुसऱ्यांदा प्रियंका ढवळेसोबत लग्नगाठ बांधली.
शशांकची होणार सून मी या घरची ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील श्री जान्हवीने म्हणजेच तेजश्री प्रधान आणि शशांकने लग्न केले होते.
त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्याने दुसऱ्यांदा लग्न केले. प्रियंका ढवळे ही पेशाने वकील आहे.
शशांक आणि प्रियंकाची ओळख फेसबुकमुळे झाले. दोघे अनेकदा फेसबुकवर गप्पा मारायचे.
त्यानंतर मधल्या काही काळात शशांक कामात खूप व्यस्त झाला. तेव्हा त्यांचे बोलणे झाले नाही. त्यामुळे प्रियंका आणि शशांकचे बोलणे सुरु झाले. तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
शशांकने जेव्हा प्रियंकाला प्रपोज केले तेव्हा तिने एका अटीवर त्याला होकार दिला होता. प्रियंका म्हणाली होती की, मी दमलेली असेल तेव्हा तू स्वयंपाक करशील ना?
प्रियंकाची ही अट शशांकने लगेच मान्य केली. शशांक हा नेहमीच बायकोला कामात मदत करतो. वेगवेगळे पदार्थ बनवत असतो.
प्रियंका आणि शशांकची ही लव्हस्टोरी हटके आहे. त्या एका अटीमुळे या दोघांचे सूर जुळले. आज त्यांना एक मुलगा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.