Aarya Ambekar Scam  Instagram
मनोरंजन बातम्या

Aarya Ambekar On Scam: गायिका आर्या आंबेकरसोबत डिजिटल स्कॅम, सोशल मीडियावर पोस्ट टाकत सांगितला किस्सा

Aarya Ambekar News: लोकप्रिय गायिका आर्या आंबेकरने गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ आणि ऑडियो अनेक युट्युब चॅनल्सकडून विनापरवानगी व्हिडीओ अपलोड केले आहेत. याबद्दल आर्याने संताप व्यक्त करत एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Aarya Ambekar On You Tube Scam

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर नेहमीच गाण्यांमुळे चर्चेत राहते. तिचा म्युझिक इव्हेंट असला म्हटल्यावर चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. आपल्या गोड आवाजानेच आर्याला स्पेशल ओळख मिळाली आहे.

आर्या आंबेकर सध्या गाण्यामुळे नाही तर, एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतंच आर्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये आर्याने एका घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने व्हिडीओमध्ये तिच्यासोबत घडलेल्या स्कॅमबद्दलची माहिती दिली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आर्याने गायलेले गाणे काही युट्युब चॅनल्सने विनापरवानगी अपलोड केले आहेत. घडलेल्या घटनेबद्दल तिने व्हिडीओमध्ये संताप व्यक्त केला आहे. आर्या आंबेकरच्या कुठल्याही परवानगी शिवाय कार्यक्रमातले काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये गायलेल्या अभंगाचे व्हिडीओ तिच्याजवळ नसल्यामुळे तिला कॉपीराईट क्लेम करता येत नाही, अशी माहिती आर्याने व्हिडीओमध्ये दिली आहे.

त्यासोबतच व्हिडीओ शेअर करताना आर्याने गायक- संगीतकार अवधूत गुप्तेलाही टॅग केलं आहे. सोबतच तिने चाहत्यांकडे यासंबंधित सल्लाही मागितला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आर्याने लिहिले की, “New scam in the market... beware musicians... मी माझ्या लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये गायलेल्या काही गाण्यांचे व्हिडीओज काही लोकांनी युट्यूबवर पोस्ट केले होते. त्या व्हिडीओमधून ऑडियो एक्सट्रॅक्ट करून “latest Marathi Kirtan” नावाच्या एका म्युझिक लेबलने audio platforms वर स्वतःच्या copyright सकट upload केले आहेत.” (Social Media)

“हे audios आणि videos माझ्या परवानगी शिवाय upload झालेले आहेत. पण त्यावर मला claim करता येण्यासाठी माझ्याकडे original व्हिडीओ किंवा ऑडियो माझ्याकडे असायला हवे. पण ते माझ्याकडे नसल्यामुळे, माझा आवाज माझ्या परवानगी शिवाय वापरला आहे. असे असूनही मला क्लेम करता येत नाहीये! How sad can this get!” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT