Jio, Airtel यूजर्सला TRAI चा Alert; मोबाईल स्कॅम कॉल्स होणार बंद

Spam Calls : तुम्ही Jio, Airtel, Vodafone Idea किंवा BSNL सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय उपयुक्त बातमी आहे.
TRAI Alert
TRAI AlertSaam Tv
Published On

TRAI Alert For Spam Calls :

तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि Jio Airtel, Vodafone Idea किंवा BSNL सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी खूप उपयुक्त बातमी आहे. अलीकडेच, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) Jio, Airtel, VI आणि BSNL युजर्ससाठी एक इशारा दिला आहे. TRAI ने युजर्सना सतत वाढत जाणाऱ्या स्पॅम (Spam) कॉलबद्दल इशारा दिला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्याच्या काळात, अनेक युजर्सना (Users) TRAI च्या नावाने स्पॅम कॉल आल्याचे समोर आले आहेत. ज्यामध्ये कॉल करणारी व्यक्ती स्वत:ला TRAIचा अधिकारी सांगत, नंबर बंद करण्याची धमकी देतो. आता ट्रायने अशा स्पॅम कॉल्सबाबत युजर्सना अलर्ट केले आहे. ट्रायने त्यांच्या नावावर येणारे कॉल्स बनावट असल्याचे म्हटले आहे.

TRAI Alert
TRAI AlertSaam Tv

ट्रायने युजर्सना मोठी माहिती दिली

ट्रायने कन्फर्म केले की, हॅकर्स आणि स्कॅमर्सद्वारे नंबर ब्लॉक करण्यासाठी असे धमकीचे कॉल केले जात आहेत. ट्रायने बनावट कॉल्सबद्दल इशारा देऊन सांगितले की, नियमानुसार ट्राय कोणत्याही वैयक्तिक टेलिकॉम युजर्सना कॉल करत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीचा नंबर ब्लॉक करत नाही.

TRAI Alert
Online Fraud : स्पॅम कॉलर्सना तुमचा नंबर कुठून मिळतो? जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला स्पॅम कॉल आल्यास येथे तक्रार करा

ट्रायने इशारा दिला की, सायबर गुन्हेगार असे धमकीचे कॉल करून टेलिकॉम युजर्सकडून वैयक्तिक माहिती काढण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून ते मोठे फ्रॉड करू शकतात. ट्रायने आपल्या निवेदनात युजर्सना सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि असेही म्हटले आहे की जर कोणाला नंबर ब्लॉक करण्यासाठी असे धमकीचे कॉल आले तर तुम्ही टेलिकॉम ऑपरेटरशी संपर्क साधू शकता आणि तक्रार नोंदवू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com