Rajinikanth Birthday: बस कंडक्टर ते साउथ सुपरस्टार; रजनीकांतला ‘असा’ मिळाला पहिला चित्रपट

Happy Birthday Rajinikanth: साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना पहिला चित्रपट कसा मिळाला?, कुली आणि कंडक्टरपासून एक यशस्वी अभिनेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? याचा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आढावा घेणार आहोत.
Rajinikanth Birthday
Rajinikanth BirthdaySaam Tv
Published On

Rajinikanth Turns At 73

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांची फक्त दक्षिण भारतातच नाही तर, संपूर्ण भारतात त्यांची प्रसिद्धी आहे. आज रजनीकांत आपला ७३ वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांनी आपल्या सिनेकारकिर्दित आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. रजनीकांत यांना दक्षिण भारतातले लोकं देवा समान मान देतात. त्यांचा चित्रपट रिलीज होणार म्हटल्यावर दक्षिण भारतामध्ये एका सणासारखेच वातावरण पाहायला मिळते.

आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पहिला चित्रपट कसा मिळाला?, कुली आणि कंडक्टरपासून एक यशस्वी अभिनेत्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? याचा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आढावा घेणार आहोत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajinikanth Birthday
Animal Hyderabadi Review:'कई लोगा अम्मा, बहीण भी नवाजते रहे'...; अ‍ॅनिमलचा हैदराबादी रिव्ह्यू ऐकलाय का?

रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजी राव गायकवाड असं आहे. त्यांची जगभरामध्ये सुपरस्टार रजनीकांत आणि थलायवा अशीच ओळख कायम आहे. रजनीकांत यांनी ‘अपूर्व रागागंगल’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रामध्ये डेब्यू केले. रजनीकांत यांचा एक प्रसिद्ध अभिनेता होण्याचा प्रवास काही सोप्पा नव्हता. बस कंडक्टर ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला सुपरस्टार असा प्रवास फार खडतर होता. अभिनेता होण्यासाठी रजनीकांत यांना त्यांचा मित्र राज बहादूरने मदत केली. त्यांच्या मदतीनेच रजनीकांत यांनी सिनेकारकिर्दित आपले नशीब आजमवण्याचे ठरवले.

रजनीकांत यांचा पहिला चित्रपट १९७५ मध्ये रिलीज झाला आहे. त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे ‘अपूर्व रागागंगल’ हा तमिळ चित्रपट होता. रजनीकांत यांना १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अंधा कानून’ चित्रपटामधून प्रसिद्धी मिळाली. मराठमोळ्या परिवारामध्ये जन्मलेल्या रजनीकांत यांनी ॲक्टिंग स्कूलमध्येच तमिळ भाषा शिकले. त्यानंतर त्यांचे नशीब पालटले. त्यांच्या स्टाईलने, बोलण्याचा लहेजा फक्त दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांनाच भावला नाही तर, प्रेक्षकांनाही ती स्टाईल खूपच आवडली. त्यांना आपल्या सिनेकारकिर्दित पहिले काही काळ खूपच कमी मानधन मिळाले. (Tollywood)

Rajinikanth Birthday
Kase Visru Song Released: अंकिता वालावलकरचं नवं गाणं रिलीज, ‘कसे विसरु’ मध्ये कोकण हार्टेडसोबत दिसणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता

रजनीकांत यांच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर, २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’मध्ये रजनीकांत शेवटचे दिसले होते. लवकरच येत्या काही दिवसांत रजनीकांत यांचा ‘थलायवा १७०’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. (Entertainment News)

Rajinikanth Birthday
Sameer Paranjape Post: “हा अभिनेता आहे ह्याला उगाच आणलंय...”; ‘सूर नवा ध्यास नवा’मधून एलिमिनेट झाल्यानंतरची समीर परांजपेची भावुक पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com