Jailer 20th Day Collection: टाळ्या, शिट्ट्या अन् कल्ला... रजनीकांतच्या ‘जेलर’ची बक्कळ कमाई; २० व्या दिवशी झाली ‘इतकी’ कमाई

Jailer Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर’ची २० व्या दिवशी किती कमाई केली आहे, एक नजर टाकूया...
Jailer 20th Day Box Office Collection
Jailer 20th Day Box Office CollectionInstagram
Published On

Jailer 20th Day Box Office Collection

दोन वर्षांच्या गॅपनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत ‘जेलर’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. रजनीकांत यांचा चाहतावर्ग फक्त दक्षिण भारतातच नाही तर, अवघ्या देशभरात त्याचा चाहतावर्ग आहे. सध्या अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले असून चित्रपटांची चर्चा प्रेक्षकांमध्ये होत आहे.

‘जेलर’सोबत बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ हे दोन चित्रपट देखील त्याचवेळी प्रदर्शित झाले होते. हे तीनही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे आणि एक से बढकर एक असले तरी या तीनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

रजनीकांतचा ‘जेलर’ १० ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शित होऊन सध्या २० दिवस झाले आहेत. चला तर जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईबद्दल...

Jailer 20th Day Box Office Collection
Adhipati Gets Emotional: इरफान तू गेल्यानंतर मी खूप रडलो... 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अधिपतीला अश्रू अनावर

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा सुरू असताना, भारतातच नाही तर, परदेशातही चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. चित्रपटाने जगभरात एका महिन्यातच ६०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तर देशभरात चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटातील रजनीकांतच्या स्टाईलने, अफलातून ॲक्शनने, हटक्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सोबतच चित्रपटाच्या कथेने, गाण्यांनी आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २० दिवसातच तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाने २० व्या दिवशी आपल्या कमाईचा आलेख कायम ठेवला आहे. चित्रपटाने ३. ४१ कोटींची कमाई केली आहे.

एकंदरीत कमाईबद्दल बोलायचं तर,चित्रपटाने पहिल्या दिवशी ४८.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी २५.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३४.०३ कोटी, चौथ्या दिवशी ४२.०२ कोटी, पाचव्या दिवशी २३.५५ कोटी, सहाव्या दिवशी ३६.०५ कोटी... तर सतराव्या दिवशी ५. ५० कोटी, अठराव्या दिवशी ६. ४३ कोटी, एकोणिसाव्या दिवशी २.५० कोटी तर आता २० दिवशी चित्रपटाने ३.४१ कोटींची कमाई केली आहे. २०० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित केलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. चित्रपटाने जगभरात ६०० कोटींचा टप्पा पार करत लवकरच ७०० कोटींचाही टप्पा गाठेल अशी निर्मात्यांना आशा आहे.

Jailer 20th Day Box Office Collection
Tuzi Mazi Jodi Jamli New Creation: अशोक सराफ- किशोरी शहाणेंनंतर अंशुमन विचारेने केलं ‘तुझी माझी जोडी जमली गं...’नवं क्रिएशन, व्हिडीओ तुफान व्हायरल

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कलानिथी मरनच्या सन टिव्ही नेटवर्कने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रजनीकांत यांच्यासोबत, शिवा राजकुमार, मिर्ना मेनॉन, तमन्ना भाटिया, मोहनलाल, राम्या क्रिष्नन, जॅकी श्रॉफ सह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट १० ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला असून तामिळ भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com