अभिनेता हृषिकेश शेलार सध्या त्याच्या 'तुला शिकवीन चांगलाचं धडा' या मालिकेमुळे चर्चेत आहे. ही मालिका सध्या रंजक वळवणावर आहे. मालिकेत अभिनेत्याच्या साखरपुडा होणार आहे. अभिनेता हृषिकेश शेलार एका मुलाखती दरम्यान खूप भावुक झाल्याचे दिसत आहे.
हृषीकेश शेलारने मुलाखतीमधील एका सेशनमध्ये दिवंगत अभिनेता इरफान खानला फोन करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नक्की हृषिकेशने इरफान खानला काय सांगितलं चला पाहुया.
हाय इरफान, कसा आहेस माझ्या भावा? तू मला आणि माझ्यासारख्या अनेक अभिनेत्यांना तू भाऊच वाटतोस. मोठा भाऊ आमच्या फिल्ड मधला. तू लवकर गेलास, पण आम्हासर्वांमध्ये तू उरून आहेस. भारतभरातील अभिनेते आणि भारताबाहेरीलही आमच्या सगळ्यांमध्ये एक-एक इरफान आहे. हीच तुझी ताकद आहे. एक नटाची काय ताकद असते हे तू दाखवून दिलास.
कोण कुठला तू जयपुरवरून आलास, कोण कुठला मी सांगलीत बसलेला मुलगा. तू गेल्यानंतर मी आयुष्यात जितका रडलो नव्हतो तितका रडलो आणि माझ्यासारखे असंख्य लोक असतील ज्यांच्या पोटात खड्डा पडला असेल. तू ग्रेट यासाठी आहेस की एक वेगळा विचार तू कॅमेरासमोर राबवू शकलास.
आता तू वाट दाखवून दिलीस आणि त्या वाटेवर चालत राहणं, अजून पुढं जाणं, अजून त्या वटवरून पुढे जाऊन अनेक प्रदेश शोधन मला सोपं आहे. पण तू ज्या काळात आलास आणि तू ज्या पद्धतीचं काम करून ठेवलंस त्याला हॅट्स ऑफ आहे मित्रा. (Celebrity)
हे अवघड असतं, हे रूढ चालत आलंय, जी रूढ परंपरा आहे, जे रूढ ग्रामर आहे, काम करण्याची जी पद्धत आहे त्याला छेद देऊन एक नवीन विचार करणं आणि तो विचार कॅमेरासमोर अनेक वर्ष सातत्याने राबवत राहणं. कारण सुरुवातीला त्याचा कडाडून विरोध केला जातो हे आम्हाला माहीत आहे.
कारण तू त्या सिस्टममध्ये कुठेच बसत नाही ना! तरीही सातत्याने तू तुझ्यावरचा विश्वास ढळू न देता ते करत राहिलास आणि आता लोक म्हणतात, 'ओ जी इरफानसाब करते थे ना वैसे वाला काम' हे तू मिळवलंस. ता जन्मात तुझी भेट होऊ शकली नाही. ही खूप मोठी खंत राहून गेली. पण हरकत नाही, तू जिथे असशील तिथे हसत असशील. आणि तू म्हणतोस तसं, ' जहाँ जायेगा वहा रोशनी लुटयेगा, रात का कोई मकान नहीं होता.' अशाच लोकांना प्रकाश देत राहिला असशील.
मी माझ्या मुलीचं नाव पण तुझ्याच नावावरून ठेवलाय. रोधर जे तुझं पात्र होता. हे अमर असं पात्र आहे. आणि आमच्याकडे असं म्हणतात, आपकी आँखोमें आपकी रुह दिखनी चाहिये. तिचं नाव रुही आहे. तिच्या डोळ्यात बघेन तेव्हा मला वाटत राहील की जरा बरं कामं करत राहा. थँक यू इरफान. (Latest Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.