Santosh Juvekar Father Saam Tv
मनोरंजन बातम्या

Santosh Juvekars: मी रिक्षा चालवायचो, पण आज संतोष हिंदी नाटक करतोय उद्या...; संंतोष जुवेकरच्या वडिलांनी व्यक्त केली खास इच्छा

Santosh Juvekars Father: मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता संतोष जुवेकर आता हिंदी मनोरंजन विश्वातही पाऊल टाकत आहे. सकाळला दिलेल्या खास मुलाखतीत संतोषचे वडीलांनी त्याच्या प्रवासाविषयी मनमोकळेपणाने सांगितले.

Shruti Vilas Kadam

Santosh Juvekar :  मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता संतोष जुवेकर आता हिंदी मनोरंजन विश्वातही पाऊल टाकत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सकाळला दिलेल्या खास मुलाखतीत संतोषचे वडील यांनी त्याच्या प्रवासाविषयी मनमोकळेपणाने सांगितले.

संतोषचे वडील म्हणाले, “संतोषला नेहमीच स्टेज लागतं. तो स्टेजवरचं बाळ आहे. मराठीत त्याने पहिलं एकपात्री नाटक केलं, मग चित्रपटात काम करायला सुरुवात केली. आता तो हिंदी नाटकात काम करतोय आणि त्याला हिंदी चित्रपटही मिळालं आहेत. म्हणतात ना, मंडपात गेला की त्या खुर्चीत बसायला मिळणं हेच खरं कौशल्य. हिंदीमध्ये एंट्री झाली आहे, पण पुढे किती मेहनत घ्यायची हे आता त्याच्यावर अवलंबून आहे.” त्यावेळी मी रिक्षा चालवायचो त्यावेळी मी अनेक काम केली. पण, त्याची प्रगती चांगली सुरु आहे.

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या काही दिवसांनंतर संतोष जुवेकर या चित्रपटांसाठी दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आला होता यावेळी त्याला अनेक टिकांचा सामना देखील करावा लागला परंतु झालेली त्याची मुलाखत आणि त्याच्या वडीलांनी त्यावर दाखवलेल्या विश्वासाचे चाहते कौतुक करत आहेत.

‘अस्मिता’, ‘सर्वगुणसंपन्न’, ‘रेडीमिक्स’, ‘फौजी’ अशा लोकप्रिय मालिकांमधून संतोष घराघरात पोहोचला. तर ‘मोरया’, ‘रेडी टू वेड’, ‘गजेंद्र’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘झीलेबी’, ‘फ्रेंड्स’ यांसारख्या चित्रपटांत त्याने केलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. मराठी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान पक्कं केल्यानंतर संतोषने OTT क्षेत्रातही पाऊल टाकलं. ‘फौजी’ या वेबसीरिजमधील त्याचा अ‍ॅक्शन अवतार विशेष गाजला. सध्या तो घाशीराम कोतवाल हे हिंदी नाटक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

WhatsApp Update: WhatsApp हॅक होण्याचा धोका संपला! 'हे' नवीन फिचर आत्ताच करा ऑन, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, भुजबळांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT