Paresh Rawal On Hera Pheri 3: बॉलिवूडची सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझी ‘हेरा फेरी’ लवकरच आपल्या तिसऱ्या भागासह प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाबाबत बऱ्याच काळापासून चर्चा रंगल्या आहेत. आता अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना परेश रावल म्हणाले की, “हेरा फेरी ३ वर काम सुरू आहे. आम्ही पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करू.” त्यांच्या या म्हणण्यानुसार प्रेक्षकांचा आवडत्या चित्रपटाची अजून शूटिंग सुरु झाली नसून या चित्रपटाची प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
या चित्रपटाबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. यामुळे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत नात्यात दुरावा आला का, असे विचारले असता परेश रावल यांनी स्पष्ट केले की, “बरंच काही घडलं आहे, पण त्यामुळे आमचे नाते बिघडलेले नाही. उलट आमचं समीकरण आणखी मजबूत झालं आहे. जखम भरून निघाली आहे आणि आमचं नातं खूप पारदर्शक आहे.”
आपल्या आयकॉनिक ‘बाबुराव’ या भूमिकेबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, “फक्त बाबुराववरच चित्रपट उभा राहू शकत नाही. त्यासाठी राजू आणि श्याम यांचीही साथ हवीच. मी असा अभिनेता नाही की ज्याला वाटतं जग फक्त माझ्यामुळे चालतं. जरी स्वतंत्र चित्रपटही कधी केला, तरी त्यात ही तिघांची मैत्री टिकणं गरजेचं आहे.”
परेश रावल लवकरच ‘अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ नंतर आता ‘हेरा फेरी ३’ कडे सगळ्यांचेच लक्ष लागले असून, बाबुराव, श्याम आणि राजू ही तिकडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवणार यात शंका नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.