Ranbir Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ranbir Kapoor : पहिला चित्रपट अन् ती ७ मिनिटे; रणबीरच्या 'त्या' सिनेमातील क्लायमॅक्स पाहून संजय लीला भन्साळी का रडले? मुलाखतीत केला खुलासा

Sanjay Leela Bhansali: रणबीरच्या पहिल्या चित्रपटातील क्लायमॅक्स सीन पाहून चक्क संजय लीला भन्साळी रडले होते. नेमकं त्यावेळी काय घडले जाणून घ्या.

Shreya Maskar

रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) संजय लीला भन्साळी यांच्या 'सांवरिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत अभिनेत्री सोनम कपूरही पाहायला मिळाली. 'सांवरिया' चित्रपट 2007ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'सांवरिया' चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना खूप आवडला होता.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) स्वतः 'सांवरिया'चा (Saawariya) क्लायमॅक्स पाहून भावुक झाले होते. त्यांना रणबीर कपूरचा अभिनय खूप आवडला होता. मीडिया रिपोर्टनुसार, संजय लीला भन्साळी यांनी एका मुलाखतीत 'सांवरिया'चित्रपटाच्या क्लायमॅक्स सांगितले होते. ते म्हणाले की, "चित्रपटातील हा माझा सर्वात आवडता भाग आहे. क्लायमॅक्सच्या सीन दरम्यान स्टेजवर ७ मिनिटे पूर्ण शांतता पसरली होती. एका शॉटमध्ये रणबीरने ज्या पद्धतीने अभिनय केला ते पाहून मी रडू लागलो. त्याच्याकडे पाहून जाणवते की तो खरा अभिनेता आहे. एक कलाकार काय करू शकतो हे त्यावेळी रणबीरने दाखवून दिले.रणबीर एक उत्कृष्ट अभिनेता आहे. कारण कलाकार कधीच चांगला किंवा वाईट नसतो. फक्त कला शुद्ध हवी. म्हणजे आपला अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडतो." असे म्हणत संजय लीला भन्साळी यांनी रणबीरचे कौतुक केले.

आता पुन्हा एकदा रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे. विशेषता या चित्रपटात आलिया भट्ट देखील आहे. आलिया आणि रणबीर बॉलिवूडचे स्टार कपल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बाळासाहेब जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम

Thane Water Shutdown News: ठाण्यात मोठी पाणीबाणी; तब्बल १२ दिवस पाणी कपात, कोणत्या भागांना बसणार फटका?

लाडक्या बहिणींना दिलासा; ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार|VIDEO

Men Health: चाळीशीनंतर पुरुषांनी ‘हे’ चार Medical चेकअप आवर्जून करा; दुसरी चाचणी सर्वात महत्त्वाची

भाजपची तामिळनाडूवर नजर; स्टॅलिन सरकारविरोधात PM मोदींनी दंड थोपटले, काय आहे फॉर्म्युला?

SCROLL FOR NEXT