Sakshi Sunil Jadhav
मध्य प्रदेशातील चंदेरी येथे तयार होणारी ही साडी तिच्या हलक्या वजनासाठी आणि पारदर्शक लूकसाठी प्रसिद्ध आहे. सिल्क आणि कॉटन धाग्यांच्या मिश्रणामुळे साडीला हलकी चमक येते आणि ती अतिशय एलिगंट दिसते.
मध्य प्रदेशातील माहेश्वर येथे बनणाऱ्या या साड्या त्यांच्या खास काठ आणि पदरासाठी ओळखल्या जातात. यामध्ये सहसा भौमितिक डिझाईन्स असतात. ऑफिस किंवा खास प्रसंगांसाठी ही साडी उत्तम पर्याय ठरते.
हातमागावर विणलेली खादी साडी पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक असते. उन्हाळ्यात ही साडी अतिशय आरामदायी असते आणि शरीराला थंडावा देते.
ओडिशामधील ही साडी इकत विणकाम पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे. शंख, चक्र किंवा फुलांच्या पारंपरिक नक्षीमुळे या साड्यांना खास आकर्षण मिळते.
पश्चिम बंगालमधील ही साडी अतिशय मऊ आणि हलकी असते. उन्हाळ्यात रोजच्या वापरासाठी ही साडी उत्तम मानली जाते. तिचे काठ थोडे जाड आणि उठावदार असतात.
दक्षिण भारतात लोकप्रिय असलेली ही साडी थोडी ताठ असते. त्यामुळे नेसल्यावर साडी नीटनेटकी आणि आकर्षक दिसते. प्रोफेशनल किंवा फॉर्मल लूकसाठी ही चांगली निवड आहे.
मलमलच्या कपड्यावर हाताने विणलेली नाजूक नक्षी ही या साडीची खासियत आहे. बारीक आणि सुबक डिझाईनमुळे साडीला रॉयल लूक मिळतो.
तामिळनाडूमधील चेट्टीनाड भागात तयार होणाऱ्या या साड्या गडद रंग आणि मोठ्या बॉर्डरसाठी प्रसिद्ध आहेत. पारंपरिक तसेच कॅज्युअल लूकसाठी या साड्या योग्य ठरतात.
आंध्र प्रदेशातील मंगलगिरी साड्या साध्या पण एलिगंट डिझाईन्ससाठी ओळखल्या जातात. या साड्यांचा काठ साधा असला तरी त्यात खास आकर्षण दिसून येते.