Girls Elope From Home : अत्याचारांच्या घटनांवर मौन पण एक प्रेमविवाह मान्य नाही? पळून गेलेल्या मुलीचे मनोगत, VIDEO पाहून तुम्हालाही कोसळेल रडू

Why Girls Elope From Home : बऱ्याच मुली पळून जाऊन लग्न करतात. सध्या सोशल मीडियावर एका महिलेने पळून गेलेल्या मुलीचं मनोगत व्यक्त केलं आहे. तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
Why Girls Elope From Home
Girls Elope From Home Saam Tv
Published On

प्रेम ही अशी गोष्ट आणि भावना आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती एकदा तरी प्रेमात पडतोच. प्रेमामध्ये जात, धर्म, पंथ, रंग आणि वर्ण असा भेदभाव केला जात नाही. फक्त समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्या मनात असलेली प्रेम भावना पाहिली जाते. प्रेमविवाहाला अद्यापही अनेक घरात विरोध होतो. त्यामुळे बऱ्याच मुली पळून जाऊन लग्न करतात. सध्या सोशल मीडियावर एका महिलेने पळून गेलेल्या मुलीचं मनोगत व्यक्त केलं आहे. तिचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.

Why Girls Elope From Home
Parenting Tips : गेम खेळण्याचा सतत हट्ट; लहान मुलांना फोनपासून दूर कसं ठेवायचं?

मनोगत

आई-बाबा तुम्ही कसे आहात. मान्य आहे मी पळून जाऊन लग्न केलं. मात्र या लग्नाला तुमचा विरोध होता, त्यामुळेच मला हे पाऊल उचलावं लागंलं. माझा निर्णय चुकीचा ठरेल असं तुम्हाला वाटत होतं. मात्र आज मी माझ्या आयुष्यात फार सुखी आहे. मी स्वत:नोकरी करते. माझे पती सुद्धा एका नामांकित कंपनीत चांगल्या पदाची नोकरी करतात. आम्हाला एक लहान बाळ सुद्धा आहे.

आई बाबा मला तुमची फार आठवण येते. मला तुम्हाला भेटावं वाटतं, तुमच्याशी बोलावं वाटतं. मी तुम्हाला आतापर्यंत खुपवेळा फोन केला मात्र तुम्ही एकदाही माझा फोन घेतला नाही. असं करू नका ना...मला तुमची फार आठवण येते. माझं बाळ आता मोठं झालं आहे. मला तुमची आणि त्याची भेट घालून द्यायाची आहे. ऐ दादा... तू तरी आई बाबांना समजाव ना, आई बाबा मला भेटा ना, माझ्याशी बोलाना.

अशा शब्दांत काजलने पळून गेलेल्या मुलीचं मनोगत व्यक्त केलं आहे. @Kajal_Ankur या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर अनेक तरुण मुलींनी कमेंट केल्या आहेत.

अत्याचारांच्या घटनांवर मौन पण एक प्रेमविवाह मान्य नाही?

राज्यात सध्या गुन्हेगारी विश्व वाढत चाललं आहे. मुली घराबेर अजिबात सुरक्षित नाहीत असं चित्र अनेक शहरांत दिसत आहे. पुणे, मुंबई, बदलापूर, कोलकाता अशा विविध शहरांमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांवर अद्यापही अनेक व्यक्ती मौन बाळगतात मात्र आपल्याच कुटुंबातील मुलींनी प्रेम विवाह केल्यास त्यात किती चुकीच्या हे सतत सांगूण मुलींची मनावर आघात करतात.

मुली पळून जाण्याची कारणे

मुली प्रेमासाठी घरातून पळून जाण्याचे प्रमाण फार वाढले आहे. मात्र तरुणी तरुणाच्या प्रेमात आहे म्हणून ती पळून गेली असं याचं एकच कारण सर्वांना माहिती आहे. या मागची खरी कारणे जाणून घेणे सुद्धा महत्वाचे आहे.

  • मुली वयात आल्यावर त्यांच्यावर जास्त बंधने लावली जातात. त्यामुळे मुली बाहेर पडण्यासाठी काही ना काही मार्ग शोधतात.

  • मुलींना सतत ओरडणे त्यांच्या चुकांवर सतत बोट ठेवणे अशी वागणून असल्यास मुली कुटुंबापासून दुरावतात.

  • घरात मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्व दिल्याने सुद्धा मुली दुखावतात आणि घराबाहेर पडतात.

मुली पळून जाऊ नयेत म्हणून काय केले पाहिजे?

मुलींना ओरडणे बंद करा

सर्वात आधी मुली कॉलेजमध्ये असताना त्यांचं वय अल्लड स्वभावाचं असतं. अशा वयात त्यांना एखादा मुलगा आवडू लागला आणि घरी तुम्हाला हे समजलं तर मुलींना लगेचच ओरडू नका.

मुलींची मानसिकता समजून घ्या

या वयात आणि परिस्थितीत मुलींना आपला प्रियकर म्हणजेच सर्वस्व वाटत असते. त्यामुळे त्यांची मानसिकता समजून घ्या आणि त्यांच्याशी संवाद साधा.

मुलींना योग्य आणि अयोग्य गोष्टी समजावून सांगा

मुलीच्या प्रेमप्रकरणांबद्दल तुम्हाला जेव्हा समजेल तेव्हा तुम्ही त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रेम आणि माया करा. समोरील व्यक्ती किती चूक आहे आणि तुम्ही किती बरोबर आहात हे तिला समजावून सांगा.

मुलींना मोकळीक द्या

तुला या मुलाशी लग्न करायचे असेल तर त्याला आणि तुला दोघांनाही शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवावी लागले, मगच आम्ही तुमचे लग्न करून देऊ, असं मुलींना सांगा. यामुळे मुलींना अपोआप चांगले काय आणि वाईट काय हे समजेल आणि त्या चांगल्या मार्गाची निवड करतील.

Why Girls Elope From Home
Parenting Tips : 'या' गोष्टींमुळे पालक आणि मुलांमध्ये वाढतो दुरावा; वेळीच सावध व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com