Ruchika Jadhav
फोनवर असलेले गेम खेळण्यासाठी लहान मुलं फार हट्ट करतात.
त्यांना गेम खेळता आला नाही किंवा फोन, लॅपटॉप त्यांच्या हातून घेतला की ते रडून मोठा गोंधळ करतात.
त्यामुळे लहान मुलांना फोनपासून दूर कसं ठेवायचं याच्या आम्ही काही टिप्स शोधल्या आहेत.
सर्व गेम मोबाईलमधील नेट आणि वायफायवर सुरू राहतात. त्यामुळे चिमुकल्यांना फोनपासून दूर ठेवण्यासाठी वायफाय बंद करून ठेवा.
लहान मुलांना खेळण्यासाठी एखाद्या व्यक्तीची गरज असते. तुम्ही लहान मुलांसोबत कॉलीटी टाईम स्पेन्ड केला पाहिजे.
मुलं सतत फोन घेत असतील त्याचा पासवर्ड बदला आणि फोन खराब झाला आहे असं मुलांना सांगा.
लहान मुलांना सतत नव नवीन खेळणी खेळायला आवडतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीची सर्व खेळणी खरेदी करून द्या.