Bigg Boss 18 : कन्फेशन रूममध्ये मोठा खुलासा! बिग बॉसने ईशाला दाखवला रजतचा खरा चेहरा

Eisha Singh : बिग बॉसने ईशाला रजत दलाल तिच्या विषयी काय बोलतो हे सांगितले. ज्यामुळे तिचा रजतवरून विश्वास उडाला आहे.
Eisha Singh
Bigg Boss 18SAAM TV
Published On

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) सध्या जोरदार गाजत आहे. प्रत्येक दिवशी नवा ड्रामा पाहायला मिळत आहे. रोज एक भांडण होत आहे. आताही बिग बॉसच्या घरात सदस्यांचे खरे रूप पाहायला मिळत आहे. बिग बॉस स्वतः घरातील सदस्यांना त्याच्या घरातील जवळच्या व्यक्तींचे खरे चेहरे दाखवत आहे.

बिग बॉसच्या घरात अनेक नाती बनतात आणि गरजेनुसार ती बदलत जातात तर कधीतरी तुटतात. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ईशा (Eisha Singh) समोर रजत दलालचे खरे रूप आले आहे. ईशाच्या पाठीमागे रजत (Rajat Dalal ) काय म्हणाला ते बिग बॉसने स्वतः सांगितले आहे. बिग बॉस विवियन डिसेना आणि ईशाला कन्फेशन रूममध्ये बोलावतात आणि रजतचा ऑडियो ऐकू देतात. रजत बोलतो की, "ती फक्त बोलते...प्रोजेक्शन देते... ती चावी लावते आणि अविनाश सुरू होतो. अविनाशच्या मदतीने ईशा पुढे जात आहे. यांना वेगळ केलं पाहिजे."

कन्फेशन रूममधून बाहेर पडताना ईशा विवियनला विचारते की, याची चर्चा करायची का? त्यावर विवियन नकार देतो. ईशा, ॲलिस, अविनाश आणि रजत बसलेले असताना. रजत ईशाला म्हणतो की, तुझ्याशी मी जे बोले आहे ते आठवते ना? त्यावर ईशा म्हणते मला चांगलेच आठवत आहे. त्यानंतर रजत विचारतो की, गोष्टी क्लिअर झाल्या का? त्यावर ईशा म्हणते की, हो सर्व गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. आता बिग बॉसच्या घरात नवीन काय होणार आणि ईशा कसा गेम खेळणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com