Sathyaraj Joins Salman Khan Starrer Sikandar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sikandar Movie : भाईजानच्या चित्रपटात 'कटप्पा'ची एन्ट्री, 'सिंकदर'मध्ये सलमान खानसोबत प्रसिद्ध खलनायकही दिसणार

Sathyaraj Joins Salman Khan Starrer Sikandar : भाईजान 'सिकंदर'च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. सलमानच्या चाहत्यांना 'सिकंदर' चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटाबद्दल अपडेट समोर आली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या कमालीचा चर्चेत आहे. कधी चित्रपटामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे अभिनेता चर्चेत आहे. ईदच्या मुहूर्तावर भाईजानच्या 'सिकंदर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर तो दिग्दर्शक ॲटलीच्या एका आगामी चित्रपटातही दिसणार अशी चर्चा रंगली आहे.

सध्या भाईजान 'सिकंदर'च्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. सलमानच्या चाहत्यांना 'सिकंदर' चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटाबद्दल अपडेट समोर आली आहे. चित्रपटामध्ये दोन कलाकारांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

'बाहुबली' मध्ये कट्टप्पाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते सत्यराज 'सिकंदर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अलीकडेच सत्यराज यांनी 'मुंज्या'मध्ये डॉक्टरची भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांच्यासोबतच चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता प्रतीक बब्बरही दिसणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगला गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली असून सलमान खानविरूद्ध सत्यराजही दिसणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य खलनायकाची भूमिका सत्यराज साकारणार आहेत. सोशल मीडियावर अधिकृत फोटो शेअर करत निर्मात्यांनी ही मोठी बातमी जाहीर केली आहे.

नाडियादवाला ग्रँडसन एन्टरटेनकडून फोटो शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, "सत्यराज सर, तुमचे स्वागत.. चित्रपटाचे तुम्हीही एक भाग होत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. टीम सिकंदरमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रतिक बब्बरसोबतही पुन्हा काम करताना आनंद होत आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची जादू लवकरात लवकर थिएटरमध्ये पाहायला मिळेल."

साजिद नाडियादवाला निर्मित 'सिकंदर'चे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास करणार आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सलमान खानसोबत रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा ॲक्शनपट 'ईद २०२५'ला रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

SCROLL FOR NEXT