साऊथ इंडस्ट्रीमध्ये कायमच ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ची चर्चा होते. बाहुबली, भल्लाळ देव, कटप्पा आणि चित्रपटातील अनेक कलाकार आजही कायमच चर्चेत आहेत. अशातच सध्या कटप्पा देखील पुन्हा एकदा त्याच्या दमदार चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. कटप्पाचे पात्र साकारणारा अभिनेता सत्यराज सध्या चर्चेत आला आहे. ‘बाहुबली २’नंतर अभिनेता सत्यराज एका दमदार चित्रपटात पुन्हा एकदा झळकणार आहे. अभिनेता लवकरच एका सुपर ह्यूमन वेपनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकतंच सुपर ह्यूमन वेपनचा (Super Human Weapon) टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत, सत्यराज, वसंत रवी, तान्या होप, राजीव मेनन, राजीव पिल्लई हे कलाकार दिसत असून चित्रपटाचे दिग्दर्शन गुहान सेनिअप्पन यांनी केलं असून निर्मिती मिलियन स्टुडिओने केली आहे. सध्या या खतरनाक टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या टीझरची सुरूवातच एका दमदार ॲक्शनने झाली आहे. चित्रपटामध्ये सर्वच अभिनेत्याने साकारलेल्या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होते. (Film)
सत्यराज चित्रपटात एका खलनायकाच्या भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटातही त्याने दमदार ॲक्शन केल्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट असून संपूर्ण भारतात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बाहुबलीनंतर पहिल्यांदाच मीडियाला भेटण्यासाठी सत्यराज मुंबईमध्ये आला आहे.
मुख्य पात्र साकारताना, सत्यराज यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत पत्रकारांना चित्रपटाविषयी माहिती दिली. मुंबईत आल्यानंतर सत्यराज यांनी पत्रकार परिषदेत आपल्या कामाच्या अनुभवाविषयी आणि चित्रपटातील भूमिकेविषयी माहिती सांगितली.
सत्यराज यांना मुंबईमध्ये पाहिल्यानंतर ते बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा डेब्यु करणार का अशी चर्चा होत आहे. रोहित शेट्टी निर्मित ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये दिपीकाच्या वडीलांचे पात्र साकारले आहे. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.