Salman Khan Upcoming Film : शाहरुख खाननंतर आता ॲटली बनवणार सलमानसोबत जोडी; 'जवान' पेक्षाही दमदार चित्रपट आणण्याच्या तयारीत

Atlee And Salman Khan Upcoming Film : सुप्रसिद्ध टॉलिवूड दिग्दर्शक ॲटलीने 'जवान'मधून बॉलिवूड डेब्यू केले आहे. दिग्दर्शक ॲटली आता शाहरूखनंतर सलमानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
Salman Khan Upcoming Film : शाहरुख खाननंतर आता ॲटली बनवणार सलमानसोबत जोडी; 'जवान' पेक्षाही दमदार चित्रपट आणण्याच्या तयारीत
Atlee And Salman Khan Upcoming FilmSaam TV

२०२३ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीमध्ये दिग्दर्शक ॲटलीचा 'जवान' चित्रपटाचा समावेश केला जातो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात १००० कोटींहून अधिकची कमाई केलेली होती. या चित्रपटामध्ये ॲटलीने शाहरूख खानसोबत स्क्रीन शेअर केलेली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून ॲटलीने बॉलिवूड डेब्यू केलं होतं. आता दिग्दर्शक ॲटली किंग खान भाईजानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. नुकतंच दिग्दर्शक ॲटलीने सलमान खानसोबतच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली आहे.

Salman Khan Upcoming Film : शाहरुख खाननंतर आता ॲटली बनवणार सलमानसोबत जोडी; 'जवान' पेक्षाही दमदार चित्रपट आणण्याच्या तयारीत
Sonakshi- Zaheer Wedding Update : सोनाक्षी सिन्हानं लग्नाआधीच असं काय केलं की सासू-सासऱ्यांच्याही डोळ्यांवर विश्वास बसेना!

मीडिया रिपोर्टनुसार, ॲटली आणि सलमान खान दोघेही अपकमिंग चित्रपटावर एकत्र काम करत आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. सलमान खानला या आगामी चित्रपटासाठी मोठं मानधन मिळणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला पुढच्या वर्षापासून सुरूवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिग्दर्शक ॲटली या आगामी चित्रपटाची स्क्रीप्ट लॉक करण्यात व्यग्र आहे. चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्स करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली करणार आहे.

सध्या सलमान खान ए.आर.मुरुगुदोसच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०२५ च्या ईदला रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर सलमान खान आणि ॲटली या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहेत.

अद्याप ॲटली आणि सलमान खानच्या चित्रपटाचं नाव ठरलेलं नाही. ॲटलीला हा चित्रपट टॉलिवूड सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत करण्याची इच्छा होती. पण अल्लू अर्जुनकडे अनेक प्रोजेक्ट होते. म्हणून त्याच्याकडे टाईम नव्हता.

अशा परिस्थितीत ॲटलीने एक नवीन स्क्रिप्ट तयार करत आता सलमान खानसोबत आगामी चित्रपटासाठी हातमिळवणी केली आहे.

Salman Khan Upcoming Film : शाहरुख खाननंतर आता ॲटली बनवणार सलमानसोबत जोडी; 'जवान' पेक्षाही दमदार चित्रपट आणण्याच्या तयारीत
Abha Sharma News : वडिलांच्या निधनानंतर घर सांभाळलं, लग्नही केलं नाही; ‘पंचायत ३’ मधील अम्माजींनी ५४ व्या वर्षी सुरु केला अभिनय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com