मुंबईत रविवारी हिंदी चित्रपटसृष्टीतील मोस्ट अवडेटेड 'झी सिने अवॉर्ड्स 2024'चे (Zee Cine Awards 2024 ) आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनी हजेरी लावत चार चाँद लावले. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सनी देओलपासून (Sunny Deol) ते आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि कियारा अडवाणीपर्यंत (Kiara Advani) सर्वांनी त्यांच्या उत्कृष्ट डिझायनर लूकमध्ये या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेता शाहरुख आणि राणी मुखर्जी यांना पॉप्युलर कॅटेगरीत सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. सनी देओल आणि कियारा आडवाणी यांना व्ह्यूअर्स चॉइस अवॉर्ड मिळाला.
कियारा अडवाणीने सोमवारी इन्स्टाग्रामवर अवॉर्ड नाईटमधील स्वतःचा आणि राणी मुखर्जीचा एक फोटो शेअर केला. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या आवडत्या अभिनेत्रीसह सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब जिंकणे. मला व्ह्यूअर्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीने सन्मानित केल्याबद्दल झी सिने अवॉर्ड्सचे आभार… प्रेक्षकांच्या प्रेमापेक्षा मोठा विजय नाही. ज्यांनी मला वोट केले आणि कथेला तुमच्या हृदयात स्थान दिले त्या सर्वांचे मी आभार मानते.'
अभिनेत्री कार्तिक आर्यननेही त्याच्या ट्रॉफीसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि एक नोट लिहिली. त्याला परफॉर्मर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला. शाहरुख खानच्या 'पठान' आणि 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी झी सिने अवॉर्ड्स 2024 मध्ये अनेक पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स ते सर्वोत्कृष्ट ॲक्शन पर्यंतचे पुरस्कार जवान चित्रपटाने जिंकले. ‘पठान’नेही मोठा विजय मिळवला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (पुरुष) पुरस्कार अरिजित सिंगला झूम जो पठान या गाण्यासाठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) हा पुरस्कार शिल्पा रावला बेशराम रंग या गाण्यासाठी मिळाला.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (लोकप्रिय)- शाहरुख खान (जवान आणि पठान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (दर्शकांची निवड)- सनी देओल (गदर 2 चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लोकप्रिय)- राणी मुखर्जी (श्रीमती चटर्जी बनाम नॉर्वे चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (दर्शकांची निवड)- कियारा अडवाणी (सत्यप्रेम की कथा चित्रपट)
- परफॉर्मर ऑफ द इयर (पुरुष)- कार्तिक आर्यन (सत्यप्रेम की कथा चित्रपट)
- वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार (महिला)- अनन्या पांडे (खो गए हम कहाँ चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - जवान चित्रपट
- सर्वोत्कृष्ट संगीत - जवान चित्रपट
- सर्वोत्कृष्ट VFX - रेड चिलीज एंटरटेनमेंट (जवान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट अॅक्शन - स्पाइरो रजाटोस, एनल अरासु, क्रेग मॅक्रै आणि टीम (जवान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - अनिरुद्ध (जवान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - अनिरुद्ध (जवान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट संवाद - सुमित अरोरा (जवान चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) - अरिजित सिंग (झूम जो पठान गाणं)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - शिल्पा राव (बेशराम रंग गाणं)
- सर्वोत्कृष्ट गाणं - कुमार (चले - जवान)
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - बॉस्को मार्टिस (झुमे जो पठान)
- सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मनीष मल्होत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट)
- सर्वोत्कृष्ट कथा - ऍटली (जवान चित्रपट)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.