Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्ना थोडक्यात बचावली, फोटो शेअर करत म्हणाली...

Rashmika Mandanna Photo Viral: नुकताच रश्मिकाने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे जी चर्चेत आली आहे. रश्मिका मंदानासोबत अशी एक घटना घडली आहे ज्यामध्ये ती थोडक्यामध्ये बचावली आहे. रश्मिकाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत आले आहेत.
Rashmika Mandanna
Rashmika MandannaSaam Tv
Published On

Rashmika Mandanna Flight Emergency Landing:

साऊथ आणि बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहते. रश्मिका आपल्या नवीन प्रोजेक्ट असो वा आपल्या पर्सनल लाइफविषयीच्या सर्व अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच रश्मिकाने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे जी चर्चेत आली आहे. रश्मिका मंदानासोबत अशी एक घटना घडली आहे ज्यामध्ये ती थोडक्यामध्ये बचावली आहे. रश्मिकाची ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत आले आहेत. पण चिंतेत येण्याचे कारण नाही कारण अभिनेत्री सुखरूप आहे. रश्मिकासोबत नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत...

रश्मिका मंदान्नाच्या फ्लाइटचे नुकताच एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेने अभिनेत्री आणि तिच्या सहप्रवाशांना धक्का बसला. रश्मिकाने फ्लाइटमध्ये बसलेला एक फोटोही शेअर केला आहे. रश्मिकाने श्रद्धासोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. रश्मिका मंदान्नाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रश्मिका अभिनेत्री श्रद्धा दाससोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत रश्मिकाने कॅप्शननमध्ये लिहिले की, 'हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे की आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून बचावलो.' रश्मिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Rashmika Mandanna
Rashmika Mandanna Instagram

रश्मिकाच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. पण अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सुखरुप आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका ज्या फ्लाइटमध्ये बसली होती ती मुंबईहून हैदराबादला जात होती. तांत्रिक बिघाडामुळे ही फ्लाइट ३० मिनिटांनी पुन्हा मुंबईला आली. या घटनेत कोणालाही दुखापत किंवा कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

Rashmika Mandanna
Rakul-Jackky Wedding: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी लग्नासाठी गोव्यात दाखल, कूल लूकमधील व्हिडीओ व्हायरल

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या 'ॲनिमल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. याशिवाय सध्या ती 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पुन्हा एकदा तो साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत धमाल करायला सज्ज झाली आहे. यासोबतच रश्मिका 'रेनबो' आणि 'द गर्लफ्रेंड' नावाच्या तेलुगू चित्रपटांमध्येही दिसणार आहे. याशिवाय ती विकी कौशलसोबत 'छावा' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.

Rashmika Mandanna
'कदाचित ही अफवा असती तर...', 'दंगल गर्ल' Suhani Bhatnagar च्या निधनामुळे ऑनस्क्रीन बहिणीला बसला धक्का

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com