Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

सलमान खान नसताना 'Bigg Boss'मध्ये होणार ड्रामा अन् फूल ऑन ॲक्शन, भाईजान सोडून 'हे' सेलिब्रिटी गाजवणार Weekend Ka Vaar

Bigg Boss 18 Week Ka Vaar Host : 'बिग बॉस 18'मध्ये या आठवड्याचा 'वीकेंड का वार' रोहित शेट्टी आणि एकता कपूर होस्ट करणार आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस 18'ला (Bigg Boss 18) दिवसेंदिवस प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घरातही रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस 18'चे होस्टिंग भाईजान म्हणजे सलमान खान करत आहे. मात्र या आठवड्यात सलमान खान होस्टिंग करताना बिग बॉसमध्ये पाहायला मिळणार नाही आहे. बिग बॉसमध्ये हा नवा ट्विस्ट आला आहे.

सलमान खान ऐवजी आता बॉलिवूडचे दोन सेलिब्रिटी घरातील सदस्यांची शाळा घेणार आहेत. ॲक्शनचा किंग रोहित शेट्टी ( Rohit Shetty ) आणि ड्रामा क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor) शनिवार- रविवारी 'वीकेंड का वार' (Week Ka Vaar ) होस्ट करणार आहे.

सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अडचणीत आहे. या आधी देखील बाबा सिद्दीकीच्या निधनाची बातमी ऐकताच सलमान खानने बिग बॉसचे शूटिंग बंद केलं होतं. आता पुन्हा तो बिग बॉसमध्ये दिसत नाही आहे. मीडिया रिपोर्टनुसार,सिनेमाच्या शूटमुळे भाईजान भाईजान बिग बॉसमध्ये अनुपस्थित राहणार आहे. सलमान खान (Salman Khan) सध्या 'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचे शूट हैदराबादमध्ये सुरू आहे.या चित्रपटात सलमान खानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील पाहायला मिळणार आहे. २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर 'सिकंदर'प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चाहते सलमानला 'बिग बॉस 18' होस्ट करताना पाहण्यासाठी आतुर आहेत. तर दुसरीकडे रोहित शेट्टी आणि एकता कपूर घरातील सदस्यांची शाळा कशी घेणार आणि या आठवड्यात घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

SCROLL FOR NEXT