Somy Ali
Somy AliSaam Tv

Somy Ali: सलमान खान बिश्नोई समाजाची माफी मागणार? एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने केला मोठा खुलासा

Salman Khan And Somy Ali: लमान खानला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सलमान खानची एक्स गर्लफ्रेडने सोमी अली चर्चेत आली आहे.
Published on

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सलमान खानला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अलिकडेच सलमान खानचे निकटवर्तीय बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली. यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली. सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे.अशातच सलमान खानची एक्स गर्लफ्रेडने सोमी अली चर्चेत आली आहे. सोमी अलीने मी सलमानच्या वतीने माफी मागते असं म्हटलं आहे.

Somy Ali
Suraj Chavan Birthday: ८ वीच पास.. आई - वडील नाही, ३०० रूपये मजुरीचं काम करून मोठा झाला 'झापूक झुपूक' सूरज चव्हाण'

नुकताच दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने," बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो. हे सलमानला माहित नाही आहे. यामुळे मी त्याच्यावतीने माफी मागते. मी सलमानसोबत अनेकदा शिकारीसाठी गेले. मी नोव्हेंबरमध्ये लॉरेन्स बिश्नोईला भेटणार आहे. बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतं हे सलमानला माहीतच नव्हतं. त्यामुळे यात काही लॉजिक नाही.

"मला कोणतीही प्रसिद्धी नको परंतु कोणाचीही हत्या होऊ नये अस मला वाटते. कोणी कोणाचंही नुकसान करू नये. माझा सलमानशी काहीही संबंध नाही. २०१२ मध्ये मी त्याच्याशी शेवटचं बोलली होती. मला फक्त एवढंच वाटतं की, कोणाचीही हत्या होऊ नये. माझा यामध्ये कोणताच फायदा नाही."

मला लॉरेन्सशी बोलायचं आहे. कारण हे घडले तेव्हा तो ५ वर्षाचा होता . आता तो ३३ वर्षाचा आहे. त्याला समजवण्याची खूप गरज आहे. साहजिकच कोणालाही जर तुम्ही सांगितलं की सलमानने तुमच्या देवाला मारलं तर त्याला काय वाटेल. सोमी अलीने काही दिवसांपूर्वी पोस्टद्वारे, लॉरेन्स भाई मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. अशी पोस्ट केली होती.

Somy Ali
Ankita Walawalkar: मंडप सजणार, सनई - चौघडे वाजणार; प्रेमाच्या माहिन्यात कोकण हार्टेड गर्लच्या लग्नाचा बार उडणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com