बिग बॉस मराठी हा टिव्हीवरील लोकप्रिय शो आहे. यंदा या शोचा पाचवा सीझन पार पडला. या पाचव्या सीझनचा विजेता बारामतीच्या मातीतला रिलस्टार सूरज चव्हाण ठरला आहे. एका खेडेगावातून मोठा झालेला सूरज चव्हाणचा प्रवास अत्यंत संघर्षमयी आहे.
या ठिकाणी झाला सूरजचा जन्म
सूरजचा जन्म पुण्यातील बारामती जिल्ह्यातील मोडवे गावात झाला आहे. सूरज चव्हाण हा मूळचा बारामतीमधील मोडवे गावचा रहिवासी आहे. सुरजच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. लहानपणीच आई- वडिलाचं निधन झालं. सात बहिणीचा एकुलता एक भाऊ सूरजचं शिक्षण आठवी पर्यत झालं आहे. आई- वडीलाचे छत्र नसल्याने सुरजला लहानपणी काम करावे लागले. लहानवयात सूरज गंवडी काम करत होता. यावेळी सूरजला ३०० रूपये मिळायचे यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही.
मेहनत करून झाला मोठा गुलिगत सूरज
सूरज मोलमजुरी करत असताना त्याला टिकटॉकबद्दल समजलं. मेहनत करून सूरजने स्वत:साठी फोन घेतला. दिवसातून एक- दोन व्हिडीओ सूरज टिकटॉकवर बनवायचा. सूरजच्या व्हिडीओ व्हायरल झाल्या. सूरजच्या कॉमेडी व्हिडीओंनी नेटकऱ्यांना खिळवून ठेवलं. यानंतर टिकटॉकला बंदी आली. अशातच सूरजला शॉर्ट फिल्मसाठी ऑफर येऊ लागल्या दरम्यान त्याला इनस्टाग्रामबद्दल माहिती मिळाली. इन्स्टाग्रामवर सूरज व्हिडीओ बनवू लागला नंतर सूरजने युट्यूबवर त्याचे अकाउंट सुरू केले. तिथे देखील तो चांगलाच व्हायरल होऊ लागला. सूरजला युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळू लागले.
सूरजला टिक टॉकवर व्हिडीओ बनवायची आवड निर्माण झाली. दररोज नवनवीन कॉमेडी व्हिडीओ तो बनवू लागला. काही दिवसांनी सुरज त्यांच्या बहिणी आणि भांवासोबत व्हिडीओ बनवायचा. हटके कॉमेडी व्हिडीओमुळे सूरज व्हायरल होऊ लागला. सूरजचे 'गोलीगत', 'बुक्कीत टेंगूल' हे डायलॉग चांगलेच फेमस झाले व तो प्रसिद्ध झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.