Anil Kapoor: अनिल कपूर होणार 'सुभेदार'; OTT वर दिसणार अ‍ॅक्शन अवतार, ढासू लूक व्हायरल

Anil Kapoor: अनिल कपूर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर मसाला अ‍ॅक्शन ड्रामामध्ये दिसणार आहेत. यात ते मुख्य भुमिका साकारत आहेत.
Anil Kapoor: अनिल कपूर होणार 'सुभेदार'; OTT वर दिसणार अ‍ॅक्शन अवतार, ढासू लूक व्हायरल
Anil Kapoor
Published On

ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर अनिल कपूरची एक ढासू चित्रपट येत आहे. 'सुभेदार' नावाच्या चित्रपटातून ते अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची शुटिंग दिवाळीपासून सुरू झालीय. या चित्रपटात अनिल कपूर मुख्य भुमिका साकारणार आहे. त्याच्याबरोबर राधिका मदान देखील मुख्य भुमिकेत आहे. ती अनिल कपूर यांच्या मुलीची भूमिका साकारत आहेत.

या ड्राम्याचं दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी हे करत आहेत. प्राईम व्हिडिओने शूटिंग सुरू झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनिल कपूर यांचा सुभेदारचा दमदार लूक सोशल मीडियावर शेअर केलाय.भारतीयांच्या हृदयात बसलेल्या सुभेदार अर्जुन मौर्य यांची कथेवर हा चित्रपट आहे. ते सैन्याचा सुभेदार होते. नागरी जीवनात सामान्य नागरिक म्हणून जगातांना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.

ते सामन्य नागरिकाचे जीवन जगताना त्यांना संघर्षांचा सामना करावा लागला होता. आपल्या मुलीसोबतचे त्याचे विस्कळीत नाते दुरुस्त करण्याचा प्रयत्न ते करतात. त्याचवेळी त्यांना समाजात समस्या येत असतात. एकेकाळी देशासाठी लढणारा सुभेदार आपल्या घराचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी देशातील शत्रूंशी लढाई करतो.

प्राइम व्हिडिओच्या ओरिजनलवर येणार्या सुभेदार चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर, आणि सुरेश त्रिवेणी हे निर्माते आहेत. तर संवाद सुरेश त्रिवाणी आणि सौरभ द्विरेदी यांनी लिहिले आहेत.

काही दिवसापूर्वी अनिल कपूर यांचा अॅनिमल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भुमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. अनिल कपूर यांनी ओटीटीवरील बिग बॉस या शोचं होस्टिंग केलं होतं. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचं होस्टिंग अभिनेते अनिल कपूर यांनी केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com