Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं निधन; अवघ्या २० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Famous Influencer Death: कंटेंट क्रिएटर बियांका डायसच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिच्या अचानक निधन झाले.
social media Influencer Bianca Dias passes away
social media Influencer Bianca Dias passes awaySaam Tv
Published On

Famous Influencer Death: ब्राझिलियन कंटेंट क्रिएटर बियांका डायस यांचे अवघ्या २० व्या वर्षी निधन झाले. इतक्या लहान वयात तिचे निधन झाल्याने तिच्या कुटुंबाला, मित्रांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एक कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर काही दिवसांतच त्यांचे निधन झाले.

बियांका सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती

पीपल मासिकाच्या मते, १९ फेब्रुवारी रोजी बियांका डायसचे निधन झाले. सोशल मीडियावर डायस खूप लोकप्रिय होती. इंस्टाग्रामवर तिचे जवळजवळ ६०,००० फॉलोअर्स होते. ती वारंवार इन्स्टाग्रामवर तिच्या दैनंदिन जीवनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असे.

social media Influencer Bianca Dias passes away
Bigg Boss Marathi 6: "तू इथे पदर पकडायला आला नाहीस!" राखीच्या नव्या चालीमुळे तन्वी-प्रभूमध्ये वादाची ठिणगी?

अलिकडच्या काही महिन्यांत, तिने लंडनमधील तिच्या सुट्टीचे फोटो देखील शेअर केले होते. तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट १८ डिसेंबर रोजी होती. जेव्हा तिने ब्राझीलमधील साओ पाउलो येथे कारमधून सेल्फी शेअर केला होता.

social media Influencer Bianca Dias passes away
Rohit Shetty: बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडण्यासाठी रोहित शेट्टीच्या घरी झाडल्या गोळ्या, तपासात धक्कादायक खुलासा

जवळच्या मित्रांनी तिच्या निधनानंतर बियांकाच्या आठवणी असलेल्या पोस्ट शेअर केल्या आहेत. तिचा मित्र आणि मसाज थेरपिस्ट जेफ कार्लोस याने बियांकासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले, "मृत्यू काहीच नाही. आमचं नातं कधीच नाही तुटणार." तिची मैत्रीण, डिजिटल क्रिएटर पॅट्रिशिया गॅंडेनने लिहिले, "मला फक्त एवढेच माहिती आहे की आम्ही सुंदर क्षण एकत्र जगलो. मी खूप प्रेमाने आणि अभिमानाने तुझी नेहमी आठवण काढेण."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com